Skip to main content

Posts

ईशान्यरंग (भाग -१) - सफर लामांच्या भूमीची

  ईशान्यरंग (भाग -१) सफर लामांच्या भूमीची  हिमालय एक व्यसन आहे.जो एकदा हिमालयात फिरायला गेला तो परत परत हिमालयाच्या वेगवेगळ्या वाटा  चोखाळत राहतो. बरं त्याचे रंग तरी किती म्हणावे.काश्मीर मध्ये तो शृंगारिक दिसतो,हिमाचलमध्ये रांगडा,उत्तराखंड मध्ये सात्विक तर ईशान्येला निसर्गसुंदर.काही वर्षांपूर्वी सैन्यात असलेल्या माझ्या शाळेतल्या वर्गमित्राने फेसबुकवर  एक फोटो  पोस्ट केला,खरंतर त्याने सहज म्हणून तो फोटो पोस्ट केला पण त्या जागेच्या सौंदर्याने मी इतकी मोहून गेले की ती जागा मनात आणि डोक्यात कोरली गेली ती कायमची,भारत चीन सीमेवरचं नितांत सुंदर असं अरुणाचल प्रदेश मधलं तवंग.  वीरमरण आलेल्या  आपल्या  २४२०  भारतीय  जवानांच्या सांडलेल्या रक्ताने पावन झालेली अशी ही  लामांची भूमी,अरुणाचल प्रदेश  ...... खूप काही इतिहास आहे तवंगला त्यामुळे लिहिण्यासारखं आणि जाणून घेण्यासारखंही बरंच काही,लिहावं तितकं थोडकं.पण सगळ्यात महत्त्वाचं जाणून घेण्यासारखं जर का काही असेल तर ते आहे १९६२ च्या भारत चीन युद्धाच्या अंगावर काटा आणणाऱ्...

दख्खनचं गतवैभव

  दख्खनचं गतवैभव  कधी कधी उत्स्फूर्तपणे घडणाऱ्या गोष्टी अविस्मरणीय आनंद देऊन जातात.दोन वर्षांपूर्वी आम्ही हम्पी बदामीला जाण्यासाठी खूप हाणामाऱ्या केल्या पण काही हाताशी लागलं नाही.हम्पीमधलं एकही हॉटेल आम्हा पामरांना आश्रय द्यायला तयार नव्हतं,शेवटी आम्ही हंपी बदामीचा नाद सोडून दुसरंच ठिकाण शोधून तिथला इतिहास पालथा घातला.मागचे दोन वर्षं कोरोनाने बाकी काही चांगलं काम केलं असेल नसेल पण हौशी पर्यटकांना विनासायास हॉटेल बुकिंग मिळण्याची तजवीज नक्कीच केली. दोन वर्षांपूर्वी जिथे एक हॉटेल आम्हाला थारा द्यायला तयार नव्हतं तिथे ह्यावर्षी ओमिक्रोनच्या आलेल्या नव्या लाटेचा प्रसादच म्हणा ना की आम्हाला म्हणाल त्या हॉटेलमध्ये आम्ही ठरवू तितके दिवस बुकिंग मिळत होतं.आज मितीला कोरोनापूर्व काळात असलेल्या संख्येच्या जेमतेम २० टक्के पर्यटक हंपीमध्ये येत असल्यामुळे पर्यटनातून मिळणाऱ्या उत्पन्नातून उदारनिर्वाह चालवणाऱ्या स्थानिक लोकांना कोरोनाचा खरंच खूप जबरदस्त फटका बसलाय हैत शंका नाही.एरव्हीच्या पर्यटनाच्या हंगामात जरुरीपेक्षा जास्त गजबजलेली इथली सगळी पर्यटन स्थळं आ...

गंध गुजरातचा (भाग २)

गंध गुजरातचा (भाग २)   साधारण  तीन चार महिने उलटले की आमच्यासारख्या भटक्यांच्या तळपायाला खरी तर खाजच यायला सुरूवात होते आणि त्यात गेले दोन वर्ष कोरोनाच्या कृपेने तब्बल जवळपास दोन वर्ष आम्हाला भटकंती उपास घडला.म्हणजे तुम्हाला आमच्या दैनेची कल्पना द्यायचीच असेल तर एखाद्या अट्टल बेवड्याचं उदाहरण पुरेसं आहे. त्याला जर त्याचा रोजचा दारूचा रतीब मिळाला नाही तर त्याची जी तगमग होत असेल तशीच काहीशी तगमग आमची ह्या दोन वर्षांत झाली असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही.त्यामुळे परीक्षा संपण्याचा आणि लॉकडाऊन उघडण्याचाच अवकाश होता की आम्ही पहिली संधी साधून बाहेर पडलोच.हाताशी जर का अगदीच मोजका वेळ असेल तर खाण्यापिण्याची चंगळ आणि अत्यंत सुस्थितीतले रस्ते ह्या दोन प्रमुख कारणांमुळे आपलं "सख्खे शेजारी" राज्यं आमच्यासाठी नेहमीच "गो टू प्लेस "असते.मला अगदी ठळकपणे  आठवतंय,आमच्या लहानपणी गुजरातचा कधीच एक पर्यटन स्थळ म्हणून विचारही होत नसे. पण काही वर्षांपूर्वी अमिताभ बच्चननं ह्...

गण गण गणांत बोते

  गण गण गणांत बोते  काही गोष्टींचा योगच असावा लागतो असं मला फार राहून राहून वाटतं.विशेषतः देवदर्शनाच्या  बाबतीत.आपण जायचं ठरवावं आणि सगळं मनासारखं म्हणजे योजल्याप्रमाणे घडत जावं असं फार वेळा होत नाही. त्यातून सध्याच्या बिकट परिस्थितीत प्रवास करायचं धाडस करणं म्हणजे धोक्याची घंटा. खरंतर मी आणि माझा नवरा फार आस्तिकही नाही आणि नास्तिकही नाही.देवाचं मूर्तरूप आम्हाला तितकंसं मान्य नसलं तरी एक दिव्य शक्ती किंवा ऊर्जा म्हणून त्याचं अमूर्तरूप आम्हाला भावतं.त्यामुळे  फार नाही तरी क्वचित अध्येमध्ये आम्हाला असे देवदर्शनाचे झटके येत असतात.आम्हाला वावगं असतं ते फक्त दोनच गोष्टींचं आपल्याकडच्या देवस्थानांचं पावित्र्य अबाधित न ठेवणाऱ्या देवस्थानांमध्ये चालणाऱ्या व्यावसायिकिकरणाचं आणि देवस्थानाच्या ठिकाणच्या व आजूबाजूच्या परिसरातल्या कमालीच्या अस्वच्छतेचं.ह्या दोन गोष्टींमुळे देवस्थानांचं मांगल्यच हरवून जातं.  देवस्थानं आणि स्वच्छता ह्यांचा सर्वसाधारणपणे एकमेकांशी छत्तीसचा आकडा . मागच्या वर्षीपासून कारंज्याला जायच...

Thy Name Is England

Thy Name Is England   " काय गं माधुरी,यंदा सुट्टीला कुठे ? ",योगवर्गात जरा स्थिरस्थावर होते की नाही तो एक काकू विचारत्या झाल्या. तसं त्यांच्या माझ्या वयात अंतर बरंच असलं तरी "भटकंती" ह्या एका समान धाग्याने आमच्या  वयामधलं अंतर बाजूला ठेवून आजवर वर्षानुवर्षं आमची मैत्री घट्ट केलीय. मग काय आम्हा दोघींना तेवढंच निमित्त गप्पाष्टकांसाठी.गप्पांच्या ओघात कळलं की त्यांचा इंग्लंडच्या सुट्टीचा बेत यूके कॉन्सुलटेच्या कृपेने पुरता उधळला गेला होता. त्यामुळे काहीश्या म्हणण्यापेक्षा बऱ्याच उद्वेगल्या होत्या त्या.साहजिकच होतं म्हणा. पैसे वाया गेल्याचं दुःख तर होतंच पण व्हिसाचा अर्ज करण्याच्या किचकट सोपस्कारापासून ते सांपत्तिक स्थिती ,संशयास्पद पार्श्वभूमी असं कोणतंही सबळ कारण नसताना व्हिसा नाकारला जाण्यापर्यंत त्यांना झालेला मनःस्ताप,त्याबद्दलची चीड आणि अपेक्षाभंगाचं दुःख त्यांच्या प्रत्येक शब्दात उमटत होतं.  २००५ च्या अखेरीपर्यंत दुबईतून काढता पाय घेण्याचं आम्ही जवळपास नक्की केलं होतं. तसं दुबई मधून का कोण जाणे पण कोणताही आंतरराष्ट्रीय प्रवास फार कठीण...

गालबोट

  गालबोट  मागच्या वर्षीच्या एप्रिलमध्ये पॅरिसचं तथाकथित सुप्रसिद्ध बॅसिलिका " Notre  Dame " आगीत होरपळून निघालं आणि साऱ्या जगात एकच हळहळ पसरली. का कुणास ठाऊक पण  मला मात्र त्याचं फारसं दुःख झालं नाही. कधी कधी त्या वास्तूचा थेट संबंध नसला तरी  प्रवासात अनपेक्षितपणे येणाऱ्या चांगल्या वाईट अनुभवांचा संबंध आपण अतिशय सोयीस्करपणे त्या त्या स्थळांशी कायमस्वरूपी जोडून मोकळे होतो आणि आपल्या सहजसुलभ  मानवी  स्वभावानुसार त्या कटू आठवणी किंवा प्रसंग आपल्या  मनावर कायमचे कोरून ठेवतो. असे घडणारे प्रसंग अकारण आपल्या प्रवासाच्या आनंदाला गालबोट लावतात. ते ही अगदी अनपेक्षितपणे. ह्या " Notre Dame " ला लागलेल्या आगीने माझ्या त्या आठवणीवर नकळत हळूच फुंकर घातली. वास्तविक ह्या Notre Dame चा थेट असा काहीच संबंध नव्हता त्या प्रसंगाशी खरं  पण Notre Dame   आम्हाला कायमचं लक्षात राहिलं  ते त्याच प्रसंगामुळे.आमच्या आतापर्यंतच्या युरोप प्रवासामध्ये जनमानसात प्रिय असलेले पण मला फारसे न भावलेल...