Skip to main content

Posts

आम्ही कैलासी - अनुभव सरकारी यात्रेचा (भाग ३)

आम्ही कैलासी    -    अनुभव सरकारी यात्रेचा   (भाग ३) दुसऱ्या दिवशी सकाळी साडे सहा वाजता लिपू पास ओलांडून चीनमध्ये प्रवेश करायचा होता.ह्याआधी २०१९ पर्यंत नारायण आश्रम ते लिपू पास हे अंतर पायी कापायला एक आठवडा लागत असे आता लिपू पास पर्यंत जरी पक्का रास्ता बांधलेला नसला तरी लिपू  पासच्या आधी अर्धा किलोमीटर अंतरापर्यंत ट्रॅक्सने जाता येतं ,पण जो काही सो कॉल्ड रस्ता आहे त्याला रस्ता म्हणायचं का असा प्रश्न. नाभीडांग ते लिपू पास अंतर होतं खरंतर सात आठ किमीचं पण इतक्या कमी अंतरात सुद्धा एक हाड जागेवर राहील तर शपथ. गुंजीतल्या ITBP चे जवान आम्ही सगळे सुरक्षितपणे लिपू पास ओलांडून भारताची सीमा पार करेपर्यंत आम्हाला सोबत करणार होते , नियमाप्रमाणे एक रुग्णवाहिकासुद्धा आमच्या ताफ्याबरोबर होतीच.सीमेवर ITBP च्या जवानांनी आम्हाला सुरक्षितपणे चिनी हद्दीत प्रवेश दिला आणि त्यांना निरोप देऊन आम्ही भारताची सीमा ओलांडली. सीमेवर चिनी पोलीस आमच्या दस्तावेजांची छाननी करण्यासाठी आधीच वर येऊन थांबले होते.  चिनी सरकारचा टूर कोऑर्डीनेटर पारंपारिक तिबेटी पांढरे गमचे घेऊन स्वागतासाठी ...
Recent posts

आम्ही कैलासी - अनुभव सरकारी यात्रेचा (भाग ४)

  आम्ही कैलासी    -    अनुभव सरकारी यात्रेचा   (भाग ४) परिक्रमेच्या पहिल्या दिवशी दार्चेनहून आम्ही यमद्वार गाठलं.आपण जे काही पोर्टर्स किंवा घोडे मागितलेले असतात ते ह्या यमद्वारलाच मिळतात. इथे यमद्वारच्या प्रवेशद्वाराशी पोर्टर्स घोडेवाले येईपर्यंत सकाळचे दहा साडे दहा वाजतात त्यामुळे आपण जरी परिक्रमा लवकर सुरु करायची ठरवली तरी ते शक्य नाही ,बरं ज्यांना फक्त पोर्टर्स हवे असतात आणि ज्यांना घोडा आणि पोर्टर दोन्ही हवं असतं त्यांचं वर्गीकरण झाल्यावर चिठ्ठ्या पडल्या जातात , त्यात ज्याचं नाव येईल तोच पोर्टर किंवा पोर्टर आणि घोडेवाला आपल्याला घ्यावा लागतो, तुम्हाला निवड करण्याची मुभा नाही.चीनने अतिशय जाणीवपूर्वक जास्तीत जास्त स्त्रिया किंवा मुली पोर्टर्स म्हणून नेमलेल्या आहेत,ज्यातल्या काही चीनसाठी हेरगिरी करणाऱ्या आहेत अशी गुप्तचर विभागाने आम्हाला आधीच कल्पना दिली असल्यामुळे पोर्टर मिळाल्या मिळाल्या आधी आम्ही दोघांनी त्या दोघींचे फोटो काढले. नवऱ्याची पोर्टर जेमतेम १८ वर्षांची , तिला मोडकं तोडकं इंग्लिश कळत होतं आणि तितकंच मोडकं तोडकं बोलता येत होतं. खरंतर बऱ्याचशा प...

आम्ही कैलासी - अनुभव सरकारी यात्रेचा (भाग २)

आम्ही कैलासी    -    अनुभव सरकारी यात्रेचा   (भाग २) यात्रा सुरु होण्याच्या दिवशी भल्या सकाळी मानसरोवर भवनात असलेल्या शंकराच्या देवळात रीतसर रुद्राभिषेक वगैरे केला गेला. काही कैलास सेवी , दिल्लीतच राहणाऱ्या यात्रेकरूंचे आप्तेष्ट त्या दिवशी सकाळी निरोप द्यायला आवर्जून हजर होते त्यामुळे आम्ही कैलास परिक्रमेला नाही तर शुभांषु शुक्ला सारखे अंतराळ स्थानकावर जायला निघाल्यासारखं वाटत होतं आणि तितकंच मनावरचं दडपणही वाढत होतं. यात्रा सुरु करण्यापूर्वी काही कैलास सेवी स्वयंसेवक आणि स्वतः उत्तर प्रदेश सरकार ह्या यात्रेमध्ये उपयोगी पडतील असे संच नाहीतर छोट्या मोठ्या वस्तू येता जाता वाटत असतात, तुमची इच्छा असेल नसेल त्यात इतकं प्रेम आणि सेवाभाव ओथंबत असतो की ते अव्हेरणं म्हणजे स्वतःलाच मुजोरपणा वाटावा.आता ह्या संपूर्ण यात्रेदरम्यान खराखुरा आधारस्तंभ कोणता असेल तर तो म्हणजे ITBP , आपले भारत तिबेट सीमा पोलीस.भारताची सीमा ओलांडून आम्ही चीन मध्ये प्रवेश करेपर्यंत भारत तिबेट सीमा पोलिसांचं पथक अद्यययावत रुग्णवाहिनीसहित सतत सावलीसारखं आमच्याबरोबर होतं.  धारचूलाची संध्याकाळ...

आम्ही कैलासी - अनुभव सरकारी यात्रेचा (भाग १)

आम्ही कैलासी   -   अनुभव   सरकारी यात्रेचा   (भाग १) सात आठ वर्षांचा असेल माझा नवरा जेव्हा त्याने इंडियन एक्सप्रेसमध्ये मागे कैलास आणि पुढे मानसरोवर असा पूर्ण पानभर छापून आलेला फोटो पाहिला होता, मानसरोवर तेव्हापासून जे त्याच्या बकेट लिस्ट मध्ये घट्ट रुतून बसलं होतं ते त्या गोष्टीला पन्नास वर्षं  उलटून गेली तरीही आज तितकंच जीवंत होतं. बरं आम्ही जातिवंत हटवादी, खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी अशा पठडीतले, त्यामुळे मानसरोवरला जाईन तर सरकारी यात्रेतूनच, ते ही लिपू लेख मार्गेच , जसे पांडव कैलासावर गेले होते तसंच. नेपाळ मार्गे वगैरे जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही ह्यावर त्याने आधीच खूणगाठ बांधली होती. पण २०२० मध्ये गलवान प्रकरण घडलं आणि चीनने भारतीय पर्यटकांना मानसरोवरची यात्रा करण्यापासून रोखलं. " Where are you planning to trek next in the Himalayas ?" असा प्रश्न ट्रेक संपता संपता गप्पांच्या ओघात आमच्या अन्नपूर्णा सर्किट ट्रेकच्या चमूने मला विचारला होता. त्यांच्या सहजच विचारलेल्या ह्या प्रश्नावर मी जेव्हा तितक्याच सहजपणे उत्तरले होते की  " This is my last Himalayan Tr...

अन्नपूर्णा

  अन्नपूर्णा   सध्या रणवीर अलाहाबादीया सगळ्या वृत्तपत्रांमध्ये दिवसरात्र झळकतोय,पण माझा रणवीर अलाहाबादीयाशी दोन वर्षांपूर्वी पहिल्यांदा परिचय झाला तो त्याच्या यू ट्यूब चॅनेलच्या माध्यमातून,प्रसिद्ध गिर्यारोहक बलजीत कौरने अन्नपूर्णा शिखर सर केल्यावर त्याने तिची घेतलेली मुलाखत ऐकण्याच्या निमित्त्याने. दोन वर्षांपूर्वी आम्ही दोन empty nesters जोडपी जुन्नरला वीकेंड ब्रेकला गेलो होतो. ऑगस्टचा महिना होता,संध्याकाळची वेळ होती,छान भुरुभुरु हलका पाऊस पडत होता आणि वातावरण मस्त कुंद झालं होतं.वाफाळत्या चहावर आमच्या गप्पा अगदी रंगात आल्या होत्या.गिर्यारोहणाशी आमचा संबंध तुटल्याल्या बरीच वर्षं उलटली होती म्हणजे आम्ही काही व्यावसायिक पातळीवरचे गिर्यारोहक नव्हतो किंवा नाही पण हौशी गिर्यारोहक म्हणता येईल.कॉलेजच्या दिवसानंतर आता पुन्हा आपल्या त्या छंदाला जीवंत करावंसं मनात आलं त्यामुळे आमच्या जुन्नरच्या छोट्याशा ब्रेकमध्ये सुद्धा आम्ही दोन गडांच्या दोन छोट्या सफरी बरेच वर्षांनंतर करणार होतो.पण गड,किल्ले पुन्हा चढायचे तर तेवढा शारीरिक फिटनेस हवा. ह्याच गप्पांच्या ओघात अचानक मित्राने खिशातून त्य...