Skip to main content

Posts

दख्खनच्या जंगलवाटा

दख्खनच्या जंगलवाटा   कधीकधी काही ठिकाणं अगदी योगायोगानेच पहिली जातात.नाही तर मुद्दाम वाट वाकडी करून ती पाहायला जाण्याचा आपण सहसा विचार करत नाही किंवा करणारही नाही कदाचित.नेमकं असंच काहीसं झालं जेव्हा आम्ही कूर्ग पहायचं ठरवलं. क्लब महिंद्राची मेम्बरशिप घेतल्यापासून आम्ही त्यांच्या कूर्गच्या प्रॉपर्टीचं बरंच कौतुक ऐकून होतो त्यामुळे ती प्रॉपर्टी पाहण्याचं कुतूहल तर होतंच,पण एखादं ठिकाण ठरवल्यावर आसपासची फारशी वाट न चोखाळली गेलेली ठिकाणं हुडकून काढणं आता काहीसं सवयीनेच होतं. त्यामुळे तेव्हा मसिनागुडी आणि येरकऊडचा समावेश आपसुकच झाला.ठिकाण कोणतंही असू दे,भारतात किंवा भारताबाहेर आमचा बराचसा भर हा "Being Glocal" वर असतो.ह्या तत्त्वाला अनुसरून आम्ही प्रत्येक ठिकाणी खाजगी वाहन वापरण्याऐवजी किंवा भाड्याने घेण्याऐवजी शक्य तितकं आणि शक्य असेल तिथे,त्या भागात वापरल्या जाणाऱ्या आणि उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाहतुकीची माध्यमं वापरण्याचा प्रयत्न करतो आणि पसंतही करतो ज्याच्यामुळेआम्हाला भटकंतीचा  खराखुरा   आनंद मिळतो. याव्यतिरिक्त तिथल्या स्थानिक लोकांशी संवाद ...

बकेट लिस्ट (भाग २)

बकेट लिस्ट (भाग २) इतक्या अडचणींची शर्यत पार केल्यानंतर अगदी प्रवासाला निघायच्या दिवशीपर्यंत सगळं काही यथासांग पार पडलंय आणि आम्ही ठरवल्याप्रमाणे खरोखरच निघालोय ह्यावर विश्वास बसत नव्हता.का कोणास ठाऊक , एक अनाहूत भीती होती मनात .पण अॅमस्टरडॅमला इमिग्रेशन मधून सुखरूप बाहेर पडलो आणि जीव भांड्यात पडला.पूर्व  यूरोपातल्या आणि पश्चिम यूरोपातल्या देशांच्या संस्कृतीतही बरीच तफावत आहे.पश्चिम यूरोपच्या जीवनशैलीमध्ये असलेला भपका आणि झगझगाट पूर्व यूरोप मध्ये कुठेही जाणवत नाही.पण तरीही अॅमस्टरडॅम मध्ये पाऊल ठेवल्या ठेवल्या इंग्लंडच्या आणि बाकी यूरोपियन देशांच्या संस्कृती मध्ये असलेला  फरक  नजरेतून निसटला नाही.आम्ही  इंग्लंड ला गेलो होतो तेव्हा मुलं अनुक्रमे वयवर्ष सहा आणि एक इतकी लहान होती.इंग्लंडमध्येही लोकं संध्याकाळी साडे पाच पर्यन्त कमालीची व्यस्त असतात.त्यांच्या रोजच्या आयुष्यातली ही व्यग्रता आम्हाला मेट्रो स्टेशन्स वर ऑफिस अवर्स मध्ये मेट्रो गाठण्याच्या लगबगीतून  जाणवायची.पण त्या घाईतही आमची दोन लहान मुलांना हाताशी आणि कडेवर सांभाळत सामान वाहून नेण्याची झटापट ...

बकेट लिस्ट (भाग – १)

बकेट लिस्ट (भाग – १) अं..हं ..हे माधुरी दीक्षितच्या त्या एकमेव मराठी सिनेमा बद्दल बोलत नाहीये मी. आपल्या मनातल्या बकेट लिस्टबद्दल बोलतेय मी .आपली बकेट लिस्ट तशी म्हटलं तर संपतच नाही कधी आणि ती प्रत्येकाची वेगवेगळी असते , पण तरीही कोणाच्या  बकेट लिस्ट मध्ये यूरोप टूर अग्रक्रमावर नाही असा एक माणूस मिळणं अशक्य. यूरोप म्हटलं की लागलीच दोनच गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात त्यातली पहिली म्हणजे “ऍन  ईवनिंग इन पॅरिस  “मधली आयफेल टॉवर समोर नाटकी लाजत , मुरडत चालणारी  शर्मिला टागोर आणि दुसरी स्वित्झर्लंडच्या हिरवळीवर फुलपाखरासारखी मनसोक्त बागडणारी “चाँदनी “ म्हणजे श्रीदेवी. त्यामुळे यूरोप म्हणजे “स्वित्झर्लंड आणि फ्रांस “ हे आपल्या सगळ्यांसाठी यूरोप  साठीचे  समानार्थी शब्द झालेले आहेत. साहजिकच इंग्लंड पलीकडचा यूरोप जेव्हा आम्ही पाहायचं ठरवलं तेव्हा सुरुवात ह्याच दोन देशांपासून होणं स्वाभाविक होतं , पण फक्त इतकंच पाहणं आमच्या बकेटलिस्टवर अन्याय होता.बाजारात एखादी भाजी आणायला म्हणून जावं आणि ताज्या टवटवीत भाज्या-फळांनी  फुललेला  बाजार पाहिल्यावर आणखी एक द...

देवभूमी

                                            देवभूमी                        यंदाच्या कोरोना विषाणूच्या जागतिक महासंकटाने बर्‍याचशा उद्योगधंद्यांवर विशेषतः सेवा क्षेत्रावर फारच दुस्तर परिणाम झाला. सूक्ष्म आणि लघु उद्योग तर जवळपास बंदच पडले.सेवा क्षेत्रातली अशीच दोन अत्यंत महत्वाची क्षेत्रं  म्हणजे आतिथ्य उद्योग आणि पर्यटन उद्योग , ज्यांना सगळ्यात मोठा फटका यंदाच्या ऐन पर्यटनाच्या हंगामात  ह्या साथीमुळे सोसावा लागलाय.ह्या दोन्ही क्षेत्रांना पुन्हा त्यांचा सूर गवसायला किती वेळ जाईल ह्याचा अदमास बांधता येणं जरा कठीणच. मग अशा बिकट परिस्थितीत , महत्प्रयासाने वर्षानुवर्षे बांधून ठेवलेले ग्राहक आणि कमावलेला गल्ला हातचे निसटू नयेत ह्यासाठी विमान वाहतूक तसचं ट्रॅवल आणि टूर कंपन्या आपापलं अस्तित्व व  ग्राहकांचा भटकंतीमधला रस  टिकून रहावा म्हणून  वेगवेगळ्या शकला आणि क्लृप्त्या लढवतायत .ह्या सगळ्या...

पिझ्झा,पास्ता आणि कोरोना...

पिझ्झा , पास्ता आणि कोरोना... “कोरोना” नामक एक अदृश्य विषाणू काय आला आणि त्याने पाहता पाहता अख्खं जग आपल्या विळख्यात घेतलं , एखाद्या अजगरासारखं.त्यात स्वतःला धनाढ्य आणि बलाढ्य म्हणवणार्‍या भल्या भल्या देशांची , यूरोप मधल्या विशेषतः इटली , जर्मनी , फ्रांस आणि त्याच बरोबरीने अमेरिकेची , ह्या विषाणूची साथ आवरता आवरता अक्षरशः भंबेरी उडालीय. ह्या साथीला आवरण्यासाठी थोड्या फार प्रमाणात प्रभावी ठरण्याचीअपेक्षा असलेलं H ydroxychloroquine मिळवण्यासाठी एरव्ही कृष्णवर्णीय म्हणून भारतीयांना कसपटा समान लेखणार्‍या वर्णभेदाच्या पुरस्कर्त्या यूरोप , अमेरिकेला मदतीसाठी भारताचे पाय धरण्याची वेळ आली . भारताने मानवीय हेतूने तात्काळ ह्या औषधाच्या निर्यातीवरचे निर्बंध काही अंशी शिथिल करून जवळपास पंचवीस देशांना ह्या औषधाचा पुरवठा   केलादेखील पण ह्या औषधासाठी भारताला धमकी वजा विनवणी करणार्‍या अमेरिकेला , धमकी न देता सुद्धा   भारताने ही मदत माणुसकीला जागून अशीही पुरवलीच असती हे मात्र दुर्दैवाने समजलं नाही कारण   सेवाभाव हा खरं तर आपल्या भारतीयांचा अंगीभूत गुण आहे , अगदी रक्तात...

God’s Own Country

God’s Own Country एखाद्या नैसर्गिक संकटाचा कोणत्याही देशावर किंवा राज्यावर होणारा दूरगामी परिणाम पडताळता येणं तसं कठीणच. तसचं काहीसं केरळच्या बाबतीत म्हणता येईल.अलीकडेच काही महिन्यांपूर्वी केरळला जाणं झालं.वास्तविक पाहता एकंदरीत पर्यटकांचा केरळकडचा ओढा पाहता फक्त पंधरा दिवस आधी विचार करून आम्हाला कुठे आश्रय मिळेल असं जरा दुरापास्तच वाटत होतं , तेही ऐन दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये.ऑक्टोबर ते डिसेंबर हा केरळचा पर्यटन हंगामच खरा तर त्यामुळे जर का केरळमध्ये काही थारा नाही मिळाला तर आम्ही आमचा बॅकअप प्लान सुद्धा तयार ठेवला होता.पण अहो आश्चर्यम ! आम्ही जसा बेत आखला होता तसं तसं त्या त्या ठिकाणी आमची सोय होत गेली अगदी अनपेक्षितपणेच ...अर्थात ती का झाली ते आम्हाला तिथे पोहोचल्यावरच लक्षात आलं. थिरुअनंथपूरमच्या एअरपोर्टवर उतरलो आणि एकही ओला / उबर मोकळी सापडायला तयार नाही. मग  रिक्षाशिवाय पर्यायच नव्हता. तिथे साधारणपणे आपल्याकडचा सांगली-सातारा-कोल्हापूरकडचा छकडा किंवा वढाप म्हणता येईल इतक्या आकाराच्या रिक्षा राजरोस रस्त्यांवर धावताना दिसतात.अशाच रिक्षाच्या शोधात असताना आमची गाठ पडली...