देवभूमी
यंदाच्या कोरोना विषाणूच्या जागतिक महासंकटाने
बर्याचशा उद्योगधंद्यांवर विशेषतः सेवा क्षेत्रावर फारच दुस्तर परिणाम झाला. सूक्ष्म
आणि लघु उद्योग तर जवळपास बंदच पडले.सेवा क्षेत्रातली अशीच दोन अत्यंत महत्वाची
क्षेत्रं म्हणजे आतिथ्य उद्योग आणि पर्यटन
उद्योग,ज्यांना सगळ्यात मोठा फटका यंदाच्या ऐन पर्यटनाच्या हंगामात ह्या साथीमुळे सोसावा लागलाय.ह्या दोन्ही
क्षेत्रांना पुन्हा त्यांचा सूर गवसायला किती वेळ जाईल ह्याचा अदमास बांधता येणं
जरा कठीणच. मग अशा बिकट परिस्थितीत,महत्प्रयासाने वर्षानुवर्षे
बांधून ठेवलेले ग्राहक आणि कमावलेला गल्ला हातचे निसटू नयेत ह्यासाठी विमान वाहतूक
तसचं ट्रॅवल आणि टूर कंपन्या आपापलं अस्तित्व व ग्राहकांचा भटकंतीमधला रस टिकून रहावा म्हणून वेगवेगळ्या
शकला आणि क्लृप्त्या लढवतायत .ह्या सगळ्यात खरं अस्तित्व पणाला लागलंय ते ट्रॅवल
टुरिजम क्षेत्रातल्या बच्चे किंवा नवोदित
व्यवसायांचं,जे अजूनही ह्या पर्यटन व्यवसाय क्षेत्रातल्या
दांडग्या खेळाडूंपुढे आपला जम बसवायला चाचपडताहेत.ह्या भानगडीत
एक नवीनच भन्नाट अशा बाळाचा जन्म झालाय “
Virtual Tourism”चा. एका ट्रॅवल
कंपनीकडून आलेल्या पोस्टमध्ये लिहिलं होतं की Lockdown च्या काळात पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आम्ही
आपल्यासाठी घेऊन आलो आहोत आगळवेगळा अनुभव “Virtual
Tourism” - तुम्ही आमच्या कंपनीच्या यू ट्यूब चॅनलवर जाऊन तुमच्या आवडीचं पर्यटन
स्थळ निवडा आणि त्या स्थळाच्या
व्हिडीओच्या माध्यमातून त्या स्थळाचा आभासी सैरसपाटा केल्याचा भरभरून आनंद घ्या.आधी
तर ही कल्पना वाचल्यावर मी थोडी चक्रावलेच कारण त्यात पहिलाच व्हिडिओ पहायला
सुचवला होता तो होता उत्तराखंडचा म्हणजेच “देवभूमी” चा ! विचार आला की हिमालयाच्या कुशीत वसलेल्या
कोणत्याही राज्याचा,स्थळाचा असा आभासी सैर सपाटा करता येतो ? हे म्हणजे तर असंच झालं की दुधाची तहान ताकावर---हिमालयाची अशी आभासी सैर
करण्याची कल्पनाच फारशी रूचत नाही तर ती करण्याचा आनंद मिळणार तरी कसा ? हिमालयचं सौन्दर्य ही एक अविस्मरणीय अशी अनुभूति आहे आणि ती साक्षात
अनुभवावीच लागते. त्याच्या कुशीत वसलेल्या कोणत्याही प्रांतात जा आणि कितीही वेळा
जा,तरीही.त्यात उत्तराखंड म्हणजे तर स्वर्गीय सुखानुभव,ज्यात निखळ,निर्लेप असा आनंद आहे - अनुभवातीत असा, कारण तिथल्या हवेतल्या कणाकणात,अणुरेणूत परमेश्वराचं अस्तित्व
आहे, त्यासाठी फक्त चारधाम यात्राच करण्याची गरज आहे असं
नाही.
उत्तराखंड हे Magic Potion आहे ज्यात
वाढत्या जंगलांमुळे वन्य पर्यटन,हिमालयासारखा अलौकिक निसर्ग सौन्दयाने
नटलेला पाठीराखा असल्यामुळे Adventure tourism व Pleasure
tourism , हिंदुधर्मात अनन्यसाधारण महत्व असलेल्या यमुनोत्री,गंगोत्रि,केदारनाथ आणि बद्रीनाथ ह्या चार धामांमुळे Spiritual
tourism आणि भारताची “ योग राजधानी” असा किताब पटकवलेल्या ऋषीकेशमुळे Wellness
Tourism ह्या सर्वांचा एक सुंदर मिलाफ
अनुभवायला मिळतो. आम्ही आमच्या उत्तराखंडच्या सहलीमध्ये जे पहिलं ते हिमालयाच्या
नखाएवढंच होतं. पण जे काही आणि जेवढं काही पाहिलं ते लौकिकार्थाने स्वर्गीय होतं.विस्तीर्ण
पसरलेला हिमालय आपल्याला आपल्यातल्या खुजेपणाची,थिटेपणाची
सातत्याने जाणीव करून देत रहातो आणि हळूहळू आपल्याला आंतर्मुख व्हायला भाग
पाडतो.त्यामुळे सहलीचा शेवट येईपर्यंत हे Magic Potion आपल्याला
आंतर्बाह्य बदलून टाकतं.संपूर्ण उत्तराखंडमध्ये इतकी देवळच देवळं विखुरलेली आहेत की त्याचा वास प्रत्येक
ठायी जाणवतो आणि म्हणूनच ह्याला म्हणतात “देवभूमी”. वन्य प्राणी,नानाविध
पक्षी ,हर प्रकारची रंगीबेरंगी फुलं,हिरवीगार
दरीखोरी... उत्तराखंडमध्ये काही नाही असं नाहीच..त्यामुळे गिर्यारोहण,यात्रेकरू,हौशी पर्यटक अशा वेगवेगळ्या वर्गवारीतले लाखो
पर्यटक उत्तराखंडकडे आकर्षित होत आले आहेत. ऋषिकेशमध्ये दरवर्षी मार्च महिन्यात
होणार्या जागतिक योग सम्मेलनात जगाच्या कांनाकोपर्यातून योगविद्या शिकण्यासाठी
हजारो लोक ह्या सम्मेलनाला हजेरी लावतात. आज उत्तराखंडच्या एकूण GDP पैकी २७ % वाटा हा त्याच्या देश
विदेशातून मिळणार्या पर्यटन व्यवसायाचा आहे. पण “योग राजधानी”च्या बहुमानाबरोबरच
ऋषिकेश white water rafting, kaya king, bungi jumping यासारख्या साहसी पर्यटनासाठी सुद्धा तितकंच
पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे.
हरिद्वार म्हणजेच ईश्वराचं दार.ज्याच्या
नावातच परमेश्वर सामावलेला आहे त्या शहराच्या मातीला त्याचा गंध नसेल ?
हरिद्वारचं
तर रेल्वे स्टेशन सुद्धा बाहेरून एखाद्या देवळा सारखंच दिसतं. म्हटलं न की इथल्या
वार्यालाही ईश्वराचा गंध आणि मांगल्याचा ,पावित्र्याचा
मोहून टाकणारा स्पर्श आहे. “ हर की पौडी ” हा हरिद्वार मधला सगळ्यात प्रसिद्ध
घाट. इथे गंगास्नानासाठी हजारो भाविकांची एकच गर्दी उसळलेली दिसते.संपूर्ण घाट
माणसांनी कसा सदैव फुललेला असतो.असं मानल जातं की समुद्रमंथनानंतर धन्वंतरी अमृताचा
घडा घेऊन जात असताना,अमृताचे काही थेंब चुकून ह्या ठिकाणी
सांडले आणि त्यामुळे ह्या "हर की पौडी"ला “ब्रम्हकुंड” असंही म्हणतात.असेच
अमृताचे काही थेंब नाशिक,उज्जैन आणि प्रयाग मध्येही सांडले
त्यामुळे ह्या चारही ठिकाणी दर बारा वर्षानी कुंभ मेळ्याचं आयोजन केलं जातं.अशी आख्यायिका
आहे की ह्या ठिकाणी भगवान विष्णू अवतरले होते,त्यांचे पाय
ह्या भूमीवर पडले म्हणून ह्या जागेला “हर की पेडी” असं नाव पडलं ज्याचा अपभ्रंश
पुढे “हर की पौडी”असा झाला.हरिद्वार मध्ये शिवालिक पर्वतरांगांमधल्या बिल्व
पर्वताच्या माथ्यावर एक रहस्यमय असं “ मनसा देवी मंदिर ”आहे.असं म्हणतात की ह्या
मनसेचा जन्म कश्यप ऋषींच्या मस्तकातून झाला. नावाप्रमाणेच “मनसा” म्हणजे मनातली
इच्छा पूर्ण करणार्या ह्या देवीच्या देवळाच्या चहूबाजूंनी असलेल्या झाडांवर आपल्याला
भाविकांनी आपल्या इच्छापूर्तीसाठी असंख्य दोरे बांधलेले दिसतात.भाविकांची इच्छा पूर्ण
झाली की बांधलेला दोरा सोडवायला पुन्हा त्यांनी इथे दर्शनाला येणं अपेक्षित आहे. अर्थातच
हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे.
पहाडी भागांमध्ये गारवा जितका सुखावणारा
असतो तितकाच तिथल्या उन्हाचा दाहसुद्धा न सोसवणारा.ऐन मे महिन्याचे दिवस होते आणि मसूरीला
पोहचेपर्यन्त सूर्य अगदी माथ्यावर आला होता. त्यामुळे मसूरीच्या रिसॉर्टवर
पोहोचल्या पोहोचल्या रिसॉर्टने स्वागतासाठी वेल्कम ड्रिंक म्हणून तत्परतेने पुढे
केलेलं बुरांश सरबत तेव्हा आमच्या शोष पडलेल्या घशाला अमृतासमान वाटलं खरं पण नंतर
तेच वेल्कम ड्रिंक आमच्यासाठी “Not Welcome” ड्रिंक ठरलं. बुरांशची झाडं (Rhododendron Arboreum)हा
उत्तरखंडचा ट्रेडमार्क आहे.उत्तराखंडच्या राज्यवृक्षाचा मान ह्या बुरांस /बुरांश च्या
झाडाला आहे.संपूर्ण प्रवासात रस्त्यालगतची ही झाडं मूकपणे सतत आपली सोबत करत राहतात. बुरांशच्या
फुलांचं सरबत हृदयरोग,मूत्रपिंडाचे विकार,सांधेदुखी,उच्च
रक्तदाब इत्यादि चिवट आजारांवर अतिशय रामबाण असा उपाय समजला जातो पण आम्हाला मात्र
ह्या वेल्कम ड्रिंकने पुरतं भुईसपाट केलं.वास्तविक पाहता बाहेरगावच्या
कोणत्याही दौर्यांवर आजकाल आपण पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत फार दक्ष असतो कारण
कोणत्याही सहलीत उद्भवणार्या आजारांचा प्रादुर्भाव हा मुख्यत्वे पाण्यातून
होतो.त्यामुळे सहसा मिनरल वॉटर व्यतिरिक्त दुसरं कोणतंही पाणी पिण्याचं आपण
कटाक्षाने टाळतोच.पण म्हणतात ना “नजर हटी दुर्घटना घटी”.पूर्ण प्रवासभर कितीही
काळजी घेत होतो तरी वेल्कम ड्रिंक मध्ये वापरलं गेलेलं स्थानिक RO वॉटर मात्र आमच्या नजतेरून सुटलं किंबहुना आमच्याच नाही तर रिर्सोर्टवर
उतरलेल्या जवळपास सगळ्यांच्याच नजरेतून सुटलं. मसूरीच्या पाण्यात कॅल्शियम चं
प्रमाण बरंच जास्त असल्यामुळे नॉर्मल RO फिल्टर मधून ते
वेगळं होत नाही आणि त्यामुळे ते आपल्या नेहमीच्या पिण्याच्या पाण्यापेक्षा
कितीतरी पटींनी जड आहे. एरव्ही आपण मुंबईकर
रोजच दूषित पाणी पचवण्याच्या फुकाच्या वल्गना करत असलो तरी रोज मुंबईचं दूषित पाणी
पिऊन सवकलेली आमची सो कॉल्ड पोलादी पोटं मसूरीच्या
पाण्याचं जडत्व पचवण्यात सपशेल असमर्थ ठरली. आमचा एक हलगर्जीपणा पुढचे तीन दिवस उलट्या आणि अतिसाराच्या
रूपाने आम्हा सगळ्यांच्या अंगाशी आला.सुदैवाने मसूरी हे थंड हवेचं ठिकाण जास्त
आणि कोणतंही आध्यात्मिक किंवा आवर्जून स्थल दर्शन करण्यासारखं ठिकाण वगैरे
नसल्यामुळे अशा बिकट अवस्थेत फारसं स्थलदर्शनाच्या वाट्याला जाण्याचं धाडस न करता, तिथल्या कुंद गारव्यात पुरेशी विश्रांति घेऊन बिनसर गाठण्यासाठी मसूरी ते
काठगोदाम अशा सात आठ तासांच्या पुढच्या प्रवासासाठी पुन्हा स्वतःला दोन्ही पायांवर
धड उभं करण्यावर आम्ही जास्त भर दिला.रात्रभरचा ट्रेनचा तो प्रवास करताना ट्रेनची एकंदर
दयनीय अवस्था पाहून आम्हाला स्वतःला तसं तयार करण्याची खरोखरच किती गरज होती हे
जाणवलं.किमान भारतात तरी लोकल ट्रेन्स ,बसेस आणि
लांब पल्ल्याच्या गाड्या अशी सार्वजनिक
वाहतुकीची आणि दळणवळणाची साधनं आणि स्वच्छता ह्यांचा दूरदूरपर्यंत संबंध नसतो. असो.बिनसरहून नैनितालकडे जाण्याच्या रस्त्यावर उत्तराखंडची खास अशी “बालमिठाई” घ्यायला अजिबात विसरू नका.
नैनिताल जितकं निसर्गसुंदर तितकाच तिथपर्यंतचा रस्ता सुद्धा ,इथे instagrammable फोटोंना
तोटाच नाही. सात डोंगरांमध्ये लपलेल्या पार्वतीच्या हिरव्या डोळ्यांसारखा आकार
असलेला तलाव म्हणून “नैनी तलाव “ असं संबोधलं जाणारा हा नैनी तलाव ह्या नैनितालचं मुख्य आकर्षण.इथला
मॉल रोड म्हणजे shopoholics साठी
पर्वणी.शॉपिंग करायचं असेल नाहीतर नसेल तरीही इथे विनाकारण विंडो शॉपिंग करत
भटकंती करण्याची मजाच और .
शिवालिक पर्वतरांगांच्या पायथ्याशी
रामनगरच्या छोट्याशा गावात आहे – १९३६ साली
स्थापन झालेलं भारतातलं पहिलं राष्ट्रीय उद्यान.पाचशेपेक्षा
जास्त पक्ष्यांच्या, सहाशे पेक्षा जास्त आशियाई हत्तीच्या
प्रजाती आणि बंगाल टायगर्सचं माहेरघर - जिम कॉर्बेट नॅशनल पार्क.वन्य पर्यटन
प्रेमींना हे कॉर्बेट पार्क एखाद्या खजिन्यापेक्षा कमी नाही.कॉर्बेटच्या जंगलात
शांतपणे वाहणारी रामगंगा नदी ह्या कॉर्बेटची lifeline तर आहेच
त्याहीपेक्षा ती असंख्य जलचरांसाठी सुद्धा संजीवनी आहे.जंगलचा सुपरस्टार BIG
CAT चं दर्शन घडणं म्हणजे कपिलाषष्ठीचा योगच जसा. ह्या कॉर्बेट पार्कच्या जीप सफारी आणि canter सफारीचं हमखास
वाघांची झलक पाहता येण्याची दाट शक्यता असलेल्या गेटसाठी परवाना मिळणं म्हणजे उंबराचं फूल हाती
लागण्यासारखं आहे. कितीही महिने आधी त्यांच्या वेबसाइटवर बुकिंगसाठी दबा धरून बसूनही ते मिळेल ह्याची काहीही हमी
नाही आणि ते चुकून माकून मिळालंच तरी त्यांचं दिव्यदर्शन घडेलच ह्याची काही
शाश्वती नाही. "आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर ” असं बहिणाबाई म्हणतात खर्या
पण ऐन मे महिन्याच्या चळचळीत उन्हात canter ride मध्ये चार तास
चटके खाऊनही भाकर काही आमच्या हाताशी लागली नाही.
पण जे मिळालं नाही त्यापेक्षा जे काही आम्ही आमच्या सहलीत मिळवलं होतं ते कित्येक पटींनी जास्त होतं.कातरवेळी हिमालयाच्या उत्तुंग शिखरांपलीकडे बुडतानच्या सूर्याकडे एकटक पाहताना आपोआप ओघळणार्या डोळ्यांमधल्या अश्रुंबरोबर गळून पडणारा आपला अहं,त्यातून अनुभवायला मिळणारी प्रगल्भता,मनःशांती,सकारात्मकता आणि मनाला स्पर्शून जाणार्या मांगल्याची अनुभूति,सगळंच कसं शब्दांच्या पलीकडलं. उत्तराखंड मध्ये अफाट निसर्गसंपदा आहे ,ज्याचं सौन्दर्य टिपायला आपले दोन डोळे अपुरे पडतात आणि आठवणी साठवायला आपली स्मरणशक्ती.निसर्ग दोहों हातांनी कसा नुसता उधळत रहातो पण ते झेलायला आपली झोळी मात्र ... ग.दि.मा म्हणतात तसं -
पण जे मिळालं नाही त्यापेक्षा जे काही आम्ही आमच्या सहलीत मिळवलं होतं ते कित्येक पटींनी जास्त होतं.कातरवेळी हिमालयाच्या उत्तुंग शिखरांपलीकडे बुडतानच्या सूर्याकडे एकटक पाहताना आपोआप ओघळणार्या डोळ्यांमधल्या अश्रुंबरोबर गळून पडणारा आपला अहं,त्यातून अनुभवायला मिळणारी प्रगल्भता,मनःशांती,सकारात्मकता आणि मनाला स्पर्शून जाणार्या मांगल्याची अनुभूति,सगळंच कसं शब्दांच्या पलीकडलं. उत्तराखंड मध्ये अफाट निसर्गसंपदा आहे ,ज्याचं सौन्दर्य टिपायला आपले दोन डोळे अपुरे पडतात आणि आठवणी साठवायला आपली स्मरणशक्ती.निसर्ग दोहों हातांनी कसा नुसता उधळत रहातो पण ते झेलायला आपली झोळी मात्र ... ग.दि.मा म्हणतात तसं -
पोटापुरता
पसा पाहिजे नको पिकाया पोळी,
देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी,
.
देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी,
.
.
.
अपुरेपण हि ना लगे,.... ना लागे पस्तावाचि पाळि
देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी.
अपुरेपण हि ना लगे,.... ना लागे पस्तावाचि पाळि
देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी.
असा हा “अखंड
भारत का देवखंड – उत्तराखंड” म्हणजे अगदी त्यांच्या tagline प्रमाणेच “Simply Heaven ” !!
माधुरी गोडबोले – माईणकर
खुपच छान. फोटो मस्त
ReplyDeleteWe have travelled to Bheemtal, Nainitaal, Jim Corbett National Park (without luck wrt tiger sighting ) many years back. Your article brought back those memories. Then two years back I travelled to Haridwar with my Yogoda Sarang Society friends or Guru Bahens:). We went to Har Ki Paudi on Tripuri purnima night at 2am or some.such time that was supposed to be the most auspicious! Simply divine experience! Then we went to Dwarhat via Kathgodam. At Dwarhat we have an Ashram situated at the most beautiful location overlooking a valley. We also visited Mahavatar Babaji's cave. The entire trip was so memorable! Really, Uttarakhand is a Dev Bhumi.
ReplyDeleteOh...you went for Ganga Aarti on tripuri Purnima night? Then it must be Divine..I am waiting to watch Ganga Aarti in Varanasi on Devdiwali as it is supposed to be a spectacular event. Manoj n I are actually eagerly waiting to visit UP for that ..but nothing can match the beauty of Uttarakhand
DeleteBeautiful description!
ReplyDelete