Skip to main content

बकेट लिस्ट (भाग – १)


बकेट लिस्ट (भाग – १)

अं..हं ..हे माधुरी दीक्षितच्या त्या एकमेव मराठी सिनेमा बद्दल बोलत नाहीये मी.आपल्या मनातल्या बकेट लिस्टबद्दल बोलतेय मी.आपली बकेट लिस्ट तशी म्हटलं तर संपतच नाही कधी आणि ती प्रत्येकाची वेगवेगळी असते,पण तरीही कोणाच्या  बकेट लिस्ट मध्ये यूरोप टूर अग्रक्रमावर नाही असा एक माणूस मिळणं अशक्य. यूरोप म्हटलं की लागलीच दोनच गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात त्यातली पहिली म्हणजे “ऍन ईवनिंग इन पॅरिस “मधली आयफेल टॉवर समोर नाटकी लाजत,मुरडत चालणारी  शर्मिला टागोर आणि दुसरी स्वित्झर्लंडच्या हिरवळीवर फुलपाखरासारखी मनसोक्त बागडणारी “चाँदनी “ म्हणजे श्रीदेवी. त्यामुळे यूरोप म्हणजे “स्वित्झर्लंड आणि फ्रांस “ हे आपल्या सगळ्यांसाठी यूरोप साठीचे समानार्थी शब्द झालेले आहेत. साहजिकच इंग्लंड पलीकडचा यूरोप जेव्हा आम्ही पाहायचं ठरवलं तेव्हा सुरुवात ह्याच दोन देशांपासून होणं स्वाभाविक होतं,पण फक्त इतकंच पाहणं आमच्या बकेटलिस्टवर अन्याय होता.बाजारात एखादी भाजी आणायला म्हणून जावं आणि ताज्या टवटवीत भाज्या-फळांनी  फुललेला  बाजार पाहिल्यावर आणखी एक दोन उचलायचा मोह न आवरता यावा तसं काहीसं यूरोप च्या बाबतीतहीआमचं झालं. युरोपचा नकाशा उघडल्यावर फक्त स्वित्झर्लंड आणि फ्रांस वर न थांबता हॉलंड आणि टिनटिन वेड्या माझा लेक आणि नवर्‍यासाठी  बेल्जियमवर सुद्धा धाड टाकायचा  मोह आम्हाला आवरला नाही.मग काय झालं ...प्रत्येकाने आपापली विश-लिस्ट सरकवली आणि आमच्या यूरोप दर्शन मोहिमेच्या पहिल्या टप्प्याचं भूमिपूजन झालं.

बर्‍याच जणांना Schengen Visa  नाकारलाही जातो असं आम्ही ऐकून होतो,त्यामुळे पहिल्यांदाच आणि त्यातही स्वतंत्रपणे  Schengen Visa  साठी अर्ज करायचा म्हटल्यावर जमवण्यासारखी होती नव्हती तितकी सगळी माहिती वेगवेगळ्या travel exhibitions मध्ये जाऊन जाणीवपूर्वक गोळा केली.सगळी व्यवस्था करायला आमच्याकडे जवळपास तीन-चार  महीने होते त्यामुळे आम्ही निर्धास्त होतो. अतिशय रीतसर आणि काळजीपूर्वक सगळी कागदपत्रं सुद्धा यथावकाश तयार केली.पण अचानक काय माझ्या नवर्‍याच्या मनात आलं कोणास ठाऊक – व्हिसा साठी लागणार्‍या सगळ्या दस्तावेजांची पुन्हा एकदा खातरजमा करून घ्यायला आणि साधारण टूर साठी एकंदरीत लागणार्‍या खर्चाचा अंदाज घेण्यासाठी म्हणून तो एका नामांकित टूर कंपनीच्या ऑफिस मध्ये थडकला आणि तिथून सगळी चक्रच फिरली. सगळी चौकशी करून झाल्यावर निघताना हसून तिथल्या रीसेप्शनिस्ट ने आमच्या सगळ्यांचे छापीलच पासपोर्ट्स आहेत न असं विचारलं आणि त्याच्या चेहर्‍यावरचं हसू मात्र, साफ मावळलं.अलीकडच्या पाच सहा वर्षात सगळं संगणकीकृत झाल्यापासून  आता काही अडचण येत नाही पण तेव्हा आम्हा दोघांचे पासपोर्ट्स जुने २० वर्षांची वैधता असलेले हस्तलिखित आणि मुलांचे नजीकच्या काळातले असल्यामुळे छापील पासपोर्ट्स होते. Schengen Visaसाठी फक्त आणि फक्त छापील पासपोर्टच लागतो, असं तिने सांगितल्यावर भर दिवसा माझ्या नवर्‍याच्या डोळ्यासमोर काजवे चमकले.

आमच्या दोघांचे छापील पासपोर्ट मिळवण्यापसून पुन्हा पहिल्यापासून सगळी तयारी करायची म्हटल्यावर  मात्र आमच्या तोंडचं पाणीच पळालं.रात्र थोडी नि सोंगं फार अशातली गत.कारण तेव्हा आताशासारखा आठवड्याभारत पासपोर्ट मिळत नसे अगदी तात्काळ सेवेमध्ये सुद्धा.फार वेळ न दवडता आमचे आम्हीच नवीन छापील पास पोर्ट्स साठीचे अर्ज केल्यानंतर आता सगळ्या प्रक्रियेची चक्र शक्य तितक्या वेगाने फिरवून लवकरात लवकर आमच्या दोघांचे पासपोर्ट कसे  हातात पाडता येतील ह्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू झाले.पासपोर्ट हातात पडल्याशिवाय व्हिसा काढणं तर अशक्यच होतं.दोन अडीच महिन्याचा अवधी हाताशी ठेवूनसुद्धा निघायला फक्त तीन आठवडे शिल्लक असताना ना आमच्याकडे नवीन पास पोर्ट्स होते ना व्हिसा.कशी बशी आतल्या गोटातली ओळख काढून नवर्‍याने पासपोर्ट अधिकार्‍याच्या भेटीची परवानगी मिळवली तेव्हा ट्रीपला जेमतेम दहा दिवस  शिल्लक होते. खूप मिनतवार्‍या केल्यावर आमच्यावर मोठेच उपकार केल्याच्या आविर्भावात “दोन-तीन  दिवसांनी पास पोर्ट्स मिळतील”असं फिसकारून त्याने आम्हाला बाहेरची दिशा दाखवली.सगळे निष्फळ प्रयत्न झाल्यावर आता हातात राहिलं होतं ते निव्वळ वाट पाहणं.देवावर हवाला ठेवून अतिशय हतबलपणे पासपोर्ट ऑफिसचे जीने उतरताना  आम्हाला आमचे घामाचे पैसेच उतरंडीला लागलेले दिसत होते पण गप्प बसण्याशिवाय पर्याय नव्हता.पण म्हणतात ना There is light at the end of the tunnel “.खरोखरच पुढल्या तीन दिवसात आम्हा दोघांचेही छापील पासपोर्ट्स आमच्या हातात पडले.पण तरी आमच्या ट्रिपला लागलेलं ग्रहण काही अजून सरलं नव्हतं कारण व्हिसा अजून बाकी होता आणि तो मिळवण्यासाठी आमच्याकडे अर्ज करण्यासाठीचा दिवस धरून फक्त सहा दिवस होते,त्यामुळे पुन्हा ट्रिपवर काजळी होतीच. पण आमचा आशावाद आम्हाला गप्प बसू देत नव्हता.दुसर्‍याच दिवशी आम्ही सगळ्या कागदपत्रांनिशी व्हिसा ऑफिस गाठून व्हिसासाठी अर्ज केला पण सापशिडीच्या खेळासारखं शिडी चढून जाऊन हळूहळू पुढे सरकताना अचानक सापाने गिळलं की कसं आपण पुन्हा झपझप वर जाण्यासाठी शिडीची वाट पाहतो,अगदी तशीच आमची त्यावेळी अवस्था होती.“ हिम्मत-ए-मर्दा तो मदद-ए-खुदा । “... अर्ज केल्यापासून चोवीस तासाच्या आत व्हिसा आमच्या हातात पडला तेव्हा कुठे जाऊन आमच्या ट्रिपला लागलेलं ग्रहण सुटलं आणि लख्ख सूर्यप्रकाश पडला. 


माधुरी गोडबोले – माईणकर
२ जून २०२० 

Comments

  1. Koshish karne walon ki kabhi haar nahi hoti....

    ReplyDelete
  2. Could feel your anxiety on not getting passports on time. Well expressed, as usual

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

ज़न्नत -ए -कश्मीर (भाग २ )

  ज़न्नत -ए -कश्मीर (भाग २ ) एव्हरेस्ट बेस कॅम्पची ट्रेक जरी कर्मधर्म संयोगाने घडली असली तरी दोन तीन ट्रेक्स अशा आहेत ज्या फार आधीपासूनच माझ्या बकेट  लिस्टमध्ये जागा पटकावून होत्या.त्यातलीच एक काश्मीर ग्रेट लेक्स.गेल्या काही वर्षांत तर ही ट्रेक तिच्या निसर्गसौंदर्यामुळे ट्रेकर्स च्या खूपच पसंतीस उतरलेली त्यामुळे ट्रेक्सची बुकिंग्स ओपन व्हायचा अवकाश आणि त्या फुल्ल होतात. पण एकदा एक ठराविक वय उलटलं की प्रत्येक वर्षी तब्येतीची समीकरणं बदलण्याची किंवा नको ते पाहुणे शरीरात आश्रयाला येण्याची भीती खूप दाट. त्यामुळे हिमालयातली कोणतीही हाय अल्टीट्युड ट्रेक करायची तर स्वतःला शारीरिक ताकद,धडधाकटपणा,चिकाटी ह्या आणि अशा बऱ्याच शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीच्या निकषांवर स्वतःला चाचपून मगच निर्णय घ्यावा लागतो.फार आधीपासून किंवा अगदी शेवटच्या क्षणी निर्णय घेणं शक्य होत नाही.पण वाटलं सध्या तरी तब्येतीचं सगळं काही आलबेल आहे तर तिथपर्यंत हात धुऊन घेतलेले बरे.काही ठिकाणंच अशी असतात की कितीही वेळा गेलात तरी मन भरत नाही.ज्यांना मधुबालाच्या सौंदर्याची नशा कळली त्यांना काश्मीरची नशा कळेल.जग म्हणतं,काश्मीर म्हण

ऊँचाई

ऊँचाई    "It has been a long road.... "From a mountain coolie, a bearer of loads , to a wearer of a coat with rows of medals who travels about in planes and worries about income tax." ----  Tenzing Norgay नामचे बाजारच्या तेनझिंग नॉरगे म्युझियम मध्ये उभं असताना तिथल्या एका बोर्डवर असलेल्या तेनझिंगच्या उद्गारांनी नकळत माझ्या मनाचा ठाव घेतला. नेपाळच्या एका अतिशय गरीब शेर्पा कुटुंबात जन्मलेला मुलगा ब्रिटिश गिर्यारोहकांसाठी मालवाहू हमालाचं काम करता करता त्याच्यात एव्हरेस्टचं शिखर गाठण्याची उर्मी येते काय आणि तीन चारदा अपयश पदरी पडून सुद्धा हार न मानता जिद्दीने शिखर सर करून नंतर इतिहास घडवतो काय.. खरंच,एव्हरेस्ट ह्या नुसत्या शब्दातच थरार,साहस,भीती,कुतूहल,उत्सुकता सगळ्या भावांचे किती तरंग आहेत.ज्यांना ज्यांना गिर्यारोहणाचं आकर्षण आहे त्या प्रत्येक गिर्यारोहकाला कधी ना कधीतरी एव्हरेस्ट शिखर सर करण्याचं स्वप्न पडत असेल.नामचे बाजारच्या त्या तेनझिंग मेमोरिअल मध्ये रेखाटलेला तेनझिंग नॉरगे आणि एडमंड हिलरीचा एव्हरेस्टचं शिखर सर करून इतिहास निर्माण करण्यापर्यंतचा प्रवास रोमांचक तर आहेच

आधी लगीन कोंढाण्याचे...

  आधी लगीन कोंढाण्याचे....  कळलंच असेल ना तुम्हाला,मी कशाबद्दल बोलतेय ते....नाही,माहितेय मला की सिंहगड काही कोणाला नवीन नाही,उलट सिंहगड आणि तानाजी हे एक अद्वितीय समीकरण आहे.माझा लेक अगदी लहान म्हणजे साधारण त्याला बोलता यायला लागल्यापासून त्याला इतिहासातल्या गोष्टी सांगितल्या की नेहमी विचारायचा ,"बाबा,खरंच हे सगळं आहे का ?".अशीच एकदा तानाजीची गोष्ट सांगितल्यावर तो इतका भारावून गेला होता की," मला आत्ता म्हणजे आता सिंहगल पाहायचाय,मला घेऊन चला.. ," म्हणून त्याने आमच्या नाकीनऊ आणले होते.तेव्हाही सिंहगडाला वरपर्यंत गाडीने जाता येत असे म्हणून आम्हीही त्याचं बोलणं मनावर घेऊन मुलांना अति उत्साहाने सिंहगड दाखवायला घेऊन गेलो होतो. पण आमचं दुर्दैव म्हणा नाहीतर सुदैव,त्यावर्षी गडापर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या दुरुस्तीचं काम सुरु असल्यामुळे गाडीने वरपर्यंत जाता येणारा रस्ता बंद होता.म्हणजे गड पायी चढून जाणं हा एकमेव पर्याय आमच्यासमोर होता.दहा वर्षांची लेक तर गड चढेल पण लेकाचं काय करायचं,जेमतेम पाच वर्षांचा तो,त्याचं वय पाहता तो पायी गड चढू शकेल हे जरा अशक्यच वाटत होतं. त्यामुळे आता