Skip to main content

Posts

God’s Own Country

God’s Own Country एखाद्या नैसर्गिक संकटाचा कोणत्याही देशावर किंवा राज्यावर होणारा दूरगामी परिणाम पडताळता येणं तसं कठीणच. तसचं काहीसं केरळच्या बाबतीत म्हणता येईल.अलीकडेच काही महिन्यांपूर्वी केरळला जाणं झालं.वास्तविक पाहता एकंदरीत पर्यटकांचा केरळकडचा ओढा पाहता फक्त पंधरा दिवस आधी विचार करून आम्हाला कुठे आश्रय मिळेल असं जरा दुरापास्तच वाटत होतं , तेही ऐन दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये.ऑक्टोबर ते डिसेंबर हा केरळचा पर्यटन हंगामच खरा तर त्यामुळे जर का केरळमध्ये काही थारा नाही मिळाला तर आम्ही आमचा बॅकअप प्लान सुद्धा तयार ठेवला होता.पण अहो आश्चर्यम ! आम्ही जसा बेत आखला होता तसं तसं त्या त्या ठिकाणी आमची सोय होत गेली अगदी अनपेक्षितपणेच ...अर्थात ती का झाली ते आम्हाला तिथे पोहोचल्यावरच लक्षात आलं. थिरुअनंथपूरमच्या एअरपोर्टवर उतरलो आणि एकही ओला / उबर मोकळी सापडायला तयार नाही. मग  रिक्षाशिवाय पर्यायच नव्हता. तिथे साधारणपणे आपल्याकडचा सांगली-सातारा-कोल्हापूरकडचा छकडा किंवा वढाप म्हणता येईल इतक्या आकाराच्या रिक्षा राजरोस रस्त्यांवर धावताना दिसतात.अशाच रिक्षाच्या शोधात असताना आमची गाठ पडली...

दुबई --- एक मायाजाल

दुबई --- एक मायाजाल मागच्या वर्षी जॉर्जीयाला जाता येता दोन्ही वेळी आमचा शारजा एअर पोर्टवर बराच मोठा stop - over  होता.तेव्हा सवडच सवड असल्यामुळे साहजिकच आमच्या दुबईतल्या वास्तव्यातल्या बर्‍याच आठवणी शारजाच्या निमित्त्याने ताज्या झाल्या.“ दुबई ” असं नुसतं उच्चारलं जरी तरी आपल्या डोळ्यांसमोर येतं ते एक चकचकीत असं अरबी राष्ट्र .खूप चमक धमक असलेलं. आपल्या मनांत वर्तमानपत्रांमधल्या अवाजवी प्रसिद्धी दिल्या गेलेल्या दुबई शॉपिंग फेस्टिवलच्या जाहिराती , तिथला सोने बाजार , अरबी अत्तरं , सगळ्यांना नादावणारा अरबी लावण्यवतीचा Belly Dance असं बरंच काही  ऐकीव क्षणार्धात डोळ्यांसमोर तरळून जातं.त्यामुळे दुबई म्हटलं की फक्त लखलखाट असं समीकरण डोक्यात बसलेलं आहे.ह्या सगळ्यामुळे जसं एकदा तरी ताज महाल नाही तर यूरोप पाहावं असं आपल्या मनात असतं अगदी तसचं आयुष्यात एकदा तरी दुबई शॉपिंग फेस्टिवलच्या निमित्त्याने दुबई पाहता यावं असं आपल्या बकेट लिस्ट मध्ये असतं. काही वर्षांपूर्वी मनोजच्या म्हणजे माझ्या नवर्‍याच्या नोकरीनिमित्त्याने काही वर्षांसाठी दुबईत राहण्याचा योग आला.त्याने जेव्हा दुबईत नोकरी ...

राधे राधे ...

राधे राधे ... आज फेसबूकने “ your memories nine years ago” असं म्हणून आठ नऊ वर्षांपूर्वीचा फोटो टाकला आणि मन साहजिकच नऊ वर्ष मागे भूतकाळात जाऊन पोहोचलं....आमच्या दिल्ली-आगरा ट्रीपमध्ये ! सहा एक वर्षांचा असेल त्यावेळी माझा धाकटा लेक.एकामागून एक झपाट्याने तो   Tintin,Archie,Tinkle,Sherlock Holmes, Agatha Christie बरोबरच आपल्या रामायण , महाभारतातल्या पौराणिक कथा आणि शिवाजी महाराजांचा इतिहास फार रस घेऊन आणि गोडीने अमर चित्रकथांच्या माध्यमातून वाचत होता. त्याचवेळी टीव्हीवरसुद्धा नेमकी छत्रपती शिवाजी महाराजांवरची एक मालिका प्रक्षेपित होत असे ज्यात शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका दाखवली होती.रोज रात्री झोपताना मुलांचा गोष्टी ऐकण्याचा रतीब असे . त्याचा बाबा  इतिहासातलं रोज एक नवीन पान त्याच्यासमोर गोष्टीरूपाने उलगडत असे.त्यामुळे इतिहास त्याच्यासाठी एक कंटाळवाणा विषय न राहता अतिशय  रंजक झाला होता आणि इतिहासबाबतचं त्याचं कुतूहल एकंदरीतच अगदी शिगेला पोहचलं होतं.त्याच्या डोक्यात घोळणार्‍या असंख्य प्रश्नांना आम्ही आमच्या परीने कितीही समाधानकारक उत्तरं दिली तरी त्याच...

सफर राज्याच्या वाईन कॅपिटलची

           सफर राज्याच्या वाईन कॅपिटलची     सध्या रोजचं वर्तमानपत्रांमध्ये सावरकरांच्या माफीनाम्यावरून पेटलेलं वाक्युद्ध पहाते तेव्हा तेव्हा मला आमची नाशिकची ट्रिप आठवते. वाटतं की  जे जे कोणी आपापल्या परीने आणि बौद्धिक कुवतीनुसार सावरकरांविषयी गरळ ओकतायंत,त्यांनी ब्रिटिशांना लिहिलेल्या माफीनाम्याचा पूर्ण संदर्भ  समजून न घेता त्यांच्यावर लांच्छन लावतायंत,त्यांना जर का त्यांच्या जन्मस्थळी नेलं तर  कदाचित सावरकरांच्या देशभक्तीवर,त्यांनी स्वातंत्र्यासाठी केलेल्या अफाट त्यागावर संशय घेण्याची ह्या थोर मंडळींना यत्किंचितही इच्छा होणार नाही.पण जसं तुकाराम म्हणतात," मूढा सांगणे न लगे " .... असो...   आमची लेक जसजशी विवाहयोग्य वयाकडे जवळजवळ सरकतेय तसतसं तिच्या लग्नासाठी काय वेगळं करता येईल असे विचार अध्येमध्ये मनात डोकावत असतात. सध्या डेस्टिनेशन वेडींग्सचं भलतंच पीक आहे त्याच अनुषंगाने कोणतंही मॅगझीन किंवा पेपरमध्ये एखादं सदर त्यासंदर्भात आलेलं असेल त...

औरंगाबादच्या कडेकपाऱ्यांत

 औरंगाबादच्या कडेकपाऱ्यांत उंचावल्या ना भुवया शीर्षक वाचून.. औरंगाबाद ? हॉलिडे डेस्टिनेशन? असा प्रश्न बऱ्याच जणांच्या मनात डोकावला असेलच ... .पण आपल्या महाराष्ट्रातसुद्धा बरंच काही  आहे  पाहण्यासारखं,आपण फक्त ते फारसं मनावर घेत नाही इतकंच.नाशिकनंतर महाराष्ट्रदर्शन दौऱ्यातील आमचा पुढचा मुक्काम पोस्ट होता "औरंगाबाद"....   अलीकडच्या पाताळयंत्री सासवा किंवा सुना ह्यांच्या स्टिरीओ टिपिकल मेलोड्रॅमॅटिक सिरिअल्स पाहणं आमच्यासारखंच ज्यांना फारसं झेपत नसेल त्यांच्यासाठी " एपिक" चॅनेलवर एकांत,रेजिमेंट डायरीज,अद्रिश्य इ.बरेच वैविध्यपूर्ण कार्यक्रम चालतात.अशाच कार्यक्रमांच्या यादीत एक माहितीपूर्ण कार्यक्रम असतो " संरचना " .ज्यात आपल्या देशातील वेगवेगळ्या भागांमधल्या प्राचीन वास्तूंच्या, मग त्यात देवळं ,महाल,गड किल्ले,लेणी,गुहा इत्यादींच्या बांधणीची स्थापत्यशास्त्र, भौतिकशास्त्र,वास्तुशास्त्र,सामान्य विज्ञान  आणि ध्वनी विज्ञान अशा निरनिराळ्या दृष्टिकोनातून माहिती दिली जाते.अशाच एका  भागामध्ये आम्हाला हम्पी आ...

भेट जॉर्जियाची स्मरते….. (भाग २)

भेट जॉर्जियाची स्मरते …..   ( भाग २) तर  अशा  अतिशय  नाट्यमय   पद्धतीने   जॉर्जियात   प्रवेश   झाल्यावर   आम्ही   लागलीच   पुढल्या   कार्यक्रमाला   लागलो .  टॅक्सी   पकडून   हॉटे ल   गाठलं.   तसा   १२   एक  तासांचा   प्रवास   झाल्यामुळे   आम्ही   बऱ्यापैकी   थकलो   होतो ,  खरं   तर   तो  थकवा   शरीराचा   कमी   आणि   मनाचा   जास्त   होता.पण  सकाळपर्यंत  ही  मनाची   आणि   शरीराची   मरगळ   जाऊन   त्याची   जागा   नवीन   चैतन्याने   घेतली   होती.   आता   आम्ही  आमच्या   परीने   जॉर्जिया   पिंजून   काढायला   पूर्ण   तयार   होतो ,  itinerary  तर  हाताशी   होतीच.   हॉटेलच्या   मदतीने   आम्ही   सिग्नाघीला   जाण्यासाठी   टॅक्सी   बुक   के...