Skip to main content

भेट जॉर्जियाची स्मरते….. (भाग २)

भेट जॉर्जियाची स्मरते….. (भाग २)

अतिशय नाट्यमय पद्धतीने जॉर्जियात प्रवेश झाल्यावर आम्ही लागलीच पुढल्या कार्यक्रमाला लागलोटॅक्सी पकडून हॉटेल गाठलं. तसा १२ एक तासांचा प्रवास झाल्यामुळे आम्ही बऱ्यापैकी थकलो होतोखरं तर तो थकवा शरीराचा कमी आणि मनाचा जास्त होता.पण सकाळपर्यंत  ही मनाची आणि शरीराची मरगळ जाऊन त्याची जागा नवीन चैतन्याने घेतली होती. आता आम्ही आमच्या परीने जॉर्जिया पिंजून काढायला पूर्ण तयार होतोitinerary तर हाताशी होतीच. हॉटेलच्या मदतीने आम्ही सिग्नाघीला जाण्यासाठी टॅक्सी बुक केली.सगळ्यात विनोदाचा भाग हा की इंग्लिशमध्ये उत्तर  देता येण्याच्या ज्या मुद्द्यावरून आमच्यादेखत त्या भारतीय कुटुंबाला जॉर्जियात प्रवेश नाकारला गेला होता, त्या खुद्द जॉर्जियन्सना मात्र इंग्लिशचा फार गंध नाही.मोजक्या व्यवसायातील लोकांना कामचलाऊ इंग्लिश बोलता येतं.त्यामुळेआम्ही जी टॅक्सी बुक केली होती ,त्याच्या टॅक्सी ड्राईव्हरला देखील ना इंग्लिश बोलता येत होतं ना धड समजत होतं पण अशा वेळी टेक्नॉलॉजी  मदतीला धावून येते. आम्हाला स्थलदर्शनाबद्दलची माहिती देण्यासाठी त्याने गूगल ट्रान्सलेटरचा आधार घेतलामग तिथून पुढे संपूर्ण दिवस आम्ही आणि तो फक्त ट्रान्सलेटरच्या सहाय्यानेच संवाद साधत होतो

जॉर्जिया कृषीसंपन्न असल्यामुळे इथे खवैय्येगिरीला बराच वाव आहे. ताज्या भाज्या,फळफळावळ ह्याची रेलचेल आहे. मांसाहारी असाल तर तुम्हाला मेजवानीच पण शाकाहारी आहात  म्हणून काहीच पर्याय नाहीत असं अजिबात नाही.एकूण नऊ प्रांतांमध्ये विभागल्या गेलेल्या जॉर्जियाच्या प्रत्येक प्रांताची स्वतःची अशी वेगळी ओळख आणि संस्कृती आहे. त्यातलाच एक अतिशय निसर्गसुंदर प्रांत म्हणजे "काखेंती ", जो त्याच्या wine culture साठी ओळखला जातो आणि ह्या काखेंती प्रांतातल्या सिग्नघीला "सिटी ऑफ लव्ह" असं संबोधलं जातं.Tbilisi ते Signaghi  च्या वाटेवर आपल्याला जागोजागी जॉर्जियन कार्पेट्स,cheese factories आणि त्यांचे खास सुका मेवा आणि मैद्यापासून बनवलेले चुर्चखेला यांची दुकानं नजरेस पडतात.

Churchkhela 

सिग्नाघीमध्ये फेरफटका मारताना, मधला टाउनहॉलचा भाग सोडला तर बाकी शहरात फारशी गजबज जाणवत नाही. रंगीबेरंगी घरांनी सजलेल्या तिथल्या रम्य परिसराचं फक्त सौंदर्यच नाही तर शांतताही अनुभवावीशी नाही तर ऐकावीशी वाटते. तिथली शांतताही बरंच काही सांगून जाते .कदाचित म्हणूनच ह्या शहराला City Of Love असं म्हणत असावेत. तिथल्या रम्य शांततेची गाज ऐकताना  किती वेळ जातो ते कळतच नाही.दुसऱ्या दिवशी लागलीच बतुमीचा पाच तासांचा प्रवासअसल्यामुळे इच्छा नसूनही आम्हाला वेळेत परत पोहोचण्यासाठी तिथून काढतं पाऊल घ्यावं लागलं. 

Signaghi - The City Of Love

एकूणच जॉर्जियामधलं जनजीवन बाकीच्या यूरोपच्या मेट्रो शहरांच्या मानाने बऱ्यापैकी संथ वाटतं म्हणजे अगदी त्यांची राजधानी Tblisi सुद्धा. मग इथली लांब पल्ल्याची गाडी सुद्धा त्याला अपवाद कशी असेल. Tbilisi ते Batumi  ट्रेनचा प्रवास आम्हाला तंतोतंत आपल्याकडच्या वेस्टर्न रेल्वेच्या स्लो ट्रेन्सची आठवण करून देणारा होता. ट्रेन सुटताना अगदी ठरलेल्या काट्यावर सुटली मात्र पुढे तिची गती इतकी मंदावली कि साधारणपणे  चार तासांचं अंतर तिने पाच तासात कापलं. स्टेशनवर उतरल्यानंतर आपल्याकडे बाहेरगावच्या ठिकाणी जसा रिक्षा आणि टॅक्सीवाल्यांचा  गिऱ्हाईक मिळवण्यासाठी ससेमिरा मागे लागतो तसाच काहीसा इथेही लागला. इथेही तुम्हाला आपल्यासारखंच टॅक्सीवाल्यांशी घासघीस करून भाडं ठरवता येतं. एका टॅक्सीवाल्याशी असंच भाडं ठरवून आम्ही सामान गाडीत टाकून हाशहुश करत टॅक्सीमध्ये  बसलो. आमचा टॅक्सीवाला जवळपास पंचविशीतला तरुण असल्यामुळे एकदम jovial होता.आम्ही इंडियन आहोत हे तर त्याला लागलीच कळलंच,पण मग इंडियातून कुठून आलात वगैरे वगैरे गप्पा सुरु झाल्या.मुंबई म्हटल्यानंतर तर तो इतका आनंदला कारण तो मिथुन चक्रवर्तीचा बेहद्द चाहता निघाला. मग आमचं हॉटेल येईपर्यंत, मिथुन चक्रवर्ती fame"I am a disco dancer "पासून घेऊन त्याला माहित होती नव्हती तेवढ्या सगळ्या मिथुनच्या गाण्यांच्या एक दोन एक दोन ओळी ऐकवून आमची चांगलीच करमणूक केली.त्याचं एकंदर मिथुन प्रेम आणि त्यामुळे पर्यायाने बॉलीवूडचं ज्ञान पाहून आम्ही तर आता पडायचेच बाकी होतो. एरव्ही immigration ऑफिसर्सना असलेला भारतीयांबद्दलचा तिटकारा बोटावर मोजण्याइतके अपवाद वगळता खुद्द जॉर्जियाच्या लोकांमध्ये आम्हाला फारसा कुठेही जाणवला नाही.भाषेची अडचण असली तरी जॉर्जियन्स बऱ्यापैकी friendly आणि warm आहेत. आमचा हा टॅक्सी ड्राइवर हे त्याचंच एक उदाहरण .बतुमी त्याच्या night life साठी ओळखलं जातं,प्रामुख्याने Casinos साठी. Casinos मध्ये कसे उगीच लोकं आपली कष्टाची कमाई पणाला लावतात आणि हरले की देशोधडीला लागतात,त्यामुळे तुम्ही कसे ह्या Casinos च्या वाट्याला जाऊ नका,असा लाख मोलाचा सल्ला देऊन, स्वतःचे भाड्याचे पैसे घेऊन तो नाहीसा झाला.बतुमीला हॉटेल मध्ये पोहोचल्यानंतर आम्ही चुकून तिथल्या townhall मध्येच आलोय कि काय असा भास झाला. हॉटेलचा परिसर एकदम townhall मध्ये बसल्याचा आभास देणारं होतं.चहुबाजूंनी त्याच हॉटेलच्या वेगवेगळ्या शैलीतील चार वेगवेगळ्या इमारती आणि मध्ये मोठा मोकळा परिसर, जिथे एका बाजूला live sexophone केनेजी ची आठवण करून देत होता,तिथेच चौकात लहान मुलं आणि त्यांच्या आया जॉर्जियन लोकनृत्य करण्यात मग्न होती आणि प्रत्येक हॉटेल खालच्या cafeteria मध्ये,कोणी कॉफी आणि तर कोणी wine  चा आस्वाद घेण्यात व्यग्र होते.वातावरण कसं भारावून गेलं होतं. ह्याआधी कोणतीही संध्याकाळ इतकी रोमँटिक वाटली नव्हती जितकी ती आज वाटत होती. बतुमीला लांबच्या लांब असा boulevard लाभला आहे आणि त्यांनी तो तितकाच अविस्मरणीय बनवलायसुद्धा . संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळेला सोनेरी सूर्यकिरणांमध्ये 
न्हाऊन निघालेल्या बतुमीच्या सुमुद्राचं आणि boulevard चं ते सोनेरी सौंदर्य केवळ शब्दातीत. ते फक्त अनुभवायचं .... संध्याकाळच्या वेळी हा boulevard  माणसांनी फुललेला आणि सायकलिंग,स्केटिंग ,जॉगिंग अशा वेगवेगळ्या  activities ने एकदम action packed वाटतो . सगळे रेस्तराँ आणि कॅफेज कसे गच्च भरलेले असतात. बाकी जॉर्जियावर जरी रशियन संस्कृतीचा प्रभाव जाणवला तरी बतुमी मात्र इतर यूरोपच्या पठडीतलंच एक शहर वाटतं ,इतका त्याच्यावर पाश्चिमात्य युरोपियन संस्कृतीचा प्रभाव जाणवतो.अशाच ह्या रोमँटिक शहराला अजून रोमँटिक फील देणारा अजून एक अभियांत्रिकी अविष्कार म्हणजे इथे दर सूर्यास्ताला एकत्र येणारे आणि विलग होणारे रोमिओ ज्युलिएटचे(अली  आणि निनो ) statues..,which is not to be missed in any case. सगळंच विलक्षण सुंदर.. 

बतुमीचा सोनेरी सूर्यास्त  





Ali  And Nino ,Monument Of Love


पण ठरल्याप्रमाणे Kutaisi ला मुक्काम हलवण्यासाठी आम्हालाअशा ह्या रोमँटिक बतुमीचा जड मनाने निरोप घेणं क्रमप्राप्त होतं . Tbilisi शहराला राजधानी हलवण्यापूर्वी Kuitaisi जॉर्जियाची प्रशासकीय राजधानी होती.Kutaisi  मध्ये बरीच युनेस्को वर्ल्ड हेरिटेज स्थळं आहेत. रिवोनि नदीच्या काठी वसलेलं हे शहर जॉर्जियाचे Tbilisi नंतर आर्थिक दृष्ट्या दुसरं महत्त्वाचं शहरआहे. Kutaisi ला पोहोचेपर्यंत तसा थोडा उशीर झाल्यामुळे,तिथे आम्ही जो होम स्टे घेतला होता त्या होम स्टेच्या सगळ्या गाड्या तिथे उतरलेल्या इतर टूरिस्ट्सना देऊ केल्या गेल्या होत्या.आम्ही तिथे फक्त एक रात्र वस्ती करणार असल्यामुळे बहुदा तरी तिथून हात हलवतच निघावं लागेल असंच वाटलं होतं  पण इतक्यात घरमालकांनी स्वतः त्यांच्या गाडीने आमचं सारथ्य करण्याची तयारी दाखविली ,मग तर आमच्यासाठी सोन्याहून पिवळं अशी अवस्था झाली.कारण आम्ही जिथे राहिलो होतो त्या घरमालकांना भाषेची अडचण तर नव्हतीच,ते अस्खलित इंग्लिश बोलू शकत होतेआणि बरीच जगभ्रमंती केलेले होते. पण त्याहीपेक्षा जास्त तेच आमच्यासाठी गाईडचही काम करणार होते ,त्यांच्या तीन पिढ्या सुरुवातीपासून ह्याच व्यवसायात असल्यामुळे,आता आम्हाला जॉर्जियाबद्दल,त्याच्या रक्तरंजीत ऐतिहासिक पार्श्वभूमीबद्दल बरंच काही जाणून घ्यायची आयती संधी चालून आली होती आणि त्याचा आम्ही पुरेपूर उपयोगही केला. Kutaisi मध्ये स्टॅलिनचे baths आहेत जे वेगवेगळ्या देशांना लिलावामार्फत विकून त्यांचं रूपांतर आता अलिशान वेलनेस रिसॉर्ट्स आणि स्पाज मध्ये करण्याची प्रक्रिया सुरु आहे. 




आदल्याच दिवशी रात्री घरमालकांनीआम्हालाआमच्या आवडी निवडींविषयी साधारण विचारून घेऊन ,दुसऱ्या दिवशी सकाळी त्यानुसार त्यांच्या आई आणि पत्नीने केलेले गरमागरम खाचापुरी,पॅनकेक्स,त्यांचे घरीच बनवलेले जॅम्स आणखी असेच बरेच काही प्रकार न्याहारीला मनसोक्त खाऊ घातले. आतापर्यंत जितक्या देशांमध्ये फिरलो तिथे बऱ्याच ठिकाणी आम्ही असे होम स्टे  घेतले आहेत पण होम स्टे मध्ये असा गरमागरम घरगुती ब्रेकफास्टचा आस्वाद घेण्याची ही आमची पहिलीच वेळ होती. आम्ही जेव्हा गेलो तेव्हा उन्हाळ्याची सुरुवात असल्यामुळे घरमालकांनी आम्हाला आमच्या कार्यक्रमात बदल सुचवून बकुरियानीच्या ऐवजी बोरजोमी  पाहण्याचं सुचवलं त्यानुसार आमच्या हॉटेल बुकिंग्स मध्ये बदल करून आम्ही  बकुरियनीच्या ऐवजी दुसऱ्या दिवशी बोर्जोमी गाठलं. ह्या बोर्जोमीला क्षारयुक्त औषधी पाण्याचे झरे आहेत जे कॉकेशिअस पर्वतरांगांमध्ये झालेल्या ज्वालामुखींमधून उगम पावून बकुरियानीच्या डोंगरांमधून वाहत येतात.असं म्हणतात की १८१६ मध्ये खेरसों ग्रेनेडीयर रेजिमेंट च्या सैनिकांना ह्या मिनरल वॉटर चा प्रथम शोध लागला.बोर्जोमीच्या सेन्ट्रल पार्कमध्ये जसेजसे आत आपण चालत जाऊ तसे तिथे ह्या औषधी पाण्याचे स्वीमिंग पूलही तिथे आहेत.बरेच यूरोपिअन्स इथे Balneotherapy साठी येतात. Kuitasi च्या होमी स्टे च्या मालकांच्या तुलनेत,बोरजामीचे आमचे होम स्टेचे मालक व्यवसायिकीकरणाचा फारसा स्पर्श झालेले नसल्यामुळे त्यांनी आमचं आदरातिथ्य करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. त्यामुळे Kutaisi च्या होमी स्टेच्या मानाने इथे आम्ही माफक दारात आणि तेही राजेशाही थाटात राहिलो.मालक तर प्रेमळ होतेच पण त्यांचं संपूर्ण कुटुंबच अतिशय Helpful आणि लाघवी होतं.घरही प्रशस्त,सगळ्या सुखसोयींनी सुसज्ज आणि गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे तक्रारीला कुठेही जागा नव्हती. बरेचदा हॉटेल स्टे मध्ये न सापडणारी आपुलकीची ऊब अशा होम स्टेज मध्ये बाहेरच्या ठिकाणी हटकून अनुभवायला मिळते. 

बाकी सगळं करता करता आमचं Tbilisi  पाहणं तर राहूनच गेलं होतं,आमच्या ट्रिपचा अखेरचा थांबा. असंही आमचा परतीचा प्रवास तिथूनच सुरु होणार असल्यामुळे आम्ही Tbilisi चं स्थलदर्शन राखून ठेवलं होतं .त्यामुळे आता वेळ आली होती Tbilisi कडे प्रयाण करण्याची.इथल्या Old Tbilisi Town Square मध्ये बरेच  छोटे मोठे tour operators आहेत जे Tbilisi ची सिटी टूर किंवा Tbilisi च्या जवळपासच्या प्रेक्षणीय स्थळांची डे ट्रिप करवतात.पण ह्या डे ट्रिप्स साठी  Town Square मध्ये गळाला लावण्यासाठी माशांच्या शोधात फिरत असलेल्या त्या tour operators च्या एजन्ट्सशी घासघीस करून best bargain मिळवावं लागतं. एव्हापर्यंत इथे चालतअसलेल्या व्यवहारांची आणि किंमतींची पुरेशी कल्पनाआल्यामुळे आम्हीसुद्धा घासघीस करण्यात तरबेज झालो होतो. अशाच एका टूर ऑपरेटरला गाठून आम्ही Tbilisi  शहराच्या आजूबाजूची must visit डेस्टिनेशन्स पाहून घेतली. 



Georgia -Russia Friendship Monument 

हॉलीडे म्हटलं की शॉपिंग आलंच.काहीतरी artifacts किंवा sovenirs घेतल्याशिवाय हॉलिडे पूर्ण होत नाही,नाही का? जॉर्जिया चांदीचे दागिनेआणि तिथल्या Wine साठी बरंच प्रसिद्ध आहे. त्यामुळे जॉर्जियाच्या Batumi ,Tbilisi अशा मोठ्या शहरांमध्ये मध्यवर्ती भागांमध्ये चांदीच्या आर्ट ज्वेलरीची आणि wine ची पावलोपावली दुकानं आहेत जिथे आपल्यासारख्या  हौशी प्रवाशांना खरेदीचा मनसोक्त आनंद घेता येतो. तसे आपण भारतीय कोणत्याही जमावात लगेच ठळकपणे लक्षात येतो म्हणूनच की काय,पण आपण अशा कोणत्याही artifacts च्या दुकानापुढून जात असताना आपलं लक्ष वेधून घेण्यासाठी "नमस्ते" हा शब्द हमखास कानांवर पडतोच पडतो. भारताबाहेर आपली भाषा ऐकायला मिळण्याचा आनंद खरोखरंच शब्दात न मांडता येण्यासारखा असतो.त्यांना नुसतं भारतीयांबद्दलच नाही तर बॉलीवूड बद्दलहीअसलेलं कमालीचं कुतूहल Tbilisi मध्ये फारसं नाही तरी  बाकी जॉर्जियामध्ये,जॉर्जियन्सच्या वागण्याबोलण्यातून जाणवतच जाणवतं मग तुम्ही त्यांच्या दुकानातून काही खरेदी करा अथवा नका करू. पण "Customer Is King " ह्या उक्तीला Tbilisi सुद्धा अपवाद नाही. Tbilisi च्या मॉलमध्ये खरेदी करायला गेलो असताना तिथल्या फूड कॉर्टच्या ज्या पिझ्झा शॉप मध्ये आम्ही vegetarian  पिझ्झाची ऑर्डर दिली होती,त्यांच्याकडून आम्हाला चुकून नॉन-vegetarian पिझ्झा सर्व्ह झाला.आम्ही त्यांच्या हे निदर्शनास आणून दिल्यावर त्यांच्याकडून झालेल्या चुकीची भरपाई म्हणून आम्ही काहीही न सांगतासवरता,आम्ही दिलेली मूळ ऑर्डर, शिवाय त्या ऑर्डरचे संपूर्ण पैसे आणि सोबत चार softies आम्हाला सर्व्ह केल्या गेल्या.ग्राहक सेवेचा हा असा मुलखावेगळा अनुभव immigrationच्या अनुभवाचा आमच्या मनातला कटूपणा पुसायला पुरेसा होता.आमचा tour guide म्हणाला होता, Georgia may not have big economy but Georgians have big heart !! 
How True .......   



माधुरी गोडबोले-माईणकर 
www.valuevacations.co.in 

२८ नोव्हेंबर २०१९

Comments

Popular posts from this blog

ज़न्नत -ए -कश्मीर (भाग २ )

  ज़न्नत -ए -कश्मीर (भाग २ ) एव्हरेस्ट बेस कॅम्पची ट्रेक जरी कर्मधर्म संयोगाने घडली असली तरी दोन तीन ट्रेक्स अशा आहेत ज्या फार आधीपासूनच माझ्या बकेट  लिस्टमध्ये जागा पटकावून होत्या.त्यातलीच एक काश्मीर ग्रेट लेक्स.गेल्या काही वर्षांत तर ही ट्रेक तिच्या निसर्गसौंदर्यामुळे ट्रेकर्स च्या खूपच पसंतीस उतरलेली त्यामुळे ट्रेक्सची बुकिंग्स ओपन व्हायचा अवकाश आणि त्या फुल्ल होतात. पण एकदा एक ठराविक वय उलटलं की प्रत्येक वर्षी तब्येतीची समीकरणं बदलण्याची किंवा नको ते पाहुणे शरीरात आश्रयाला येण्याची भीती खूप दाट. त्यामुळे हिमालयातली कोणतीही हाय अल्टीट्युड ट्रेक करायची तर स्वतःला शारीरिक ताकद,धडधाकटपणा,चिकाटी ह्या आणि अशा बऱ्याच शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीच्या निकषांवर स्वतःला चाचपून मगच निर्णय घ्यावा लागतो.फार आधीपासून किंवा अगदी शेवटच्या क्षणी निर्णय घेणं शक्य होत नाही.पण वाटलं सध्या तरी तब्येतीचं सगळं काही आलबेल आहे तर तिथपर्यंत हात धुऊन घेतलेले बरे.काही ठिकाणंच अशी असतात की कितीही वेळा गेलात तरी मन भरत नाही.ज्यांना मधुबालाच्या सौंदर्याची नशा कळली त्यांना काश्मीरची नशा कळेल.जग म्हणतं,काश्मीर म्हण

ऊँचाई

ऊँचाई    "It has been a long road.... "From a mountain coolie, a bearer of loads , to a wearer of a coat with rows of medals who travels about in planes and worries about income tax." ----  Tenzing Norgay नामचे बाजारच्या तेनझिंग नॉरगे म्युझियम मध्ये उभं असताना तिथल्या एका बोर्डवर असलेल्या तेनझिंगच्या उद्गारांनी नकळत माझ्या मनाचा ठाव घेतला. नेपाळच्या एका अतिशय गरीब शेर्पा कुटुंबात जन्मलेला मुलगा ब्रिटिश गिर्यारोहकांसाठी मालवाहू हमालाचं काम करता करता त्याच्यात एव्हरेस्टचं शिखर गाठण्याची उर्मी येते काय आणि तीन चारदा अपयश पदरी पडून सुद्धा हार न मानता जिद्दीने शिखर सर करून नंतर इतिहास घडवतो काय.. खरंच,एव्हरेस्ट ह्या नुसत्या शब्दातच थरार,साहस,भीती,कुतूहल,उत्सुकता सगळ्या भावांचे किती तरंग आहेत.ज्यांना ज्यांना गिर्यारोहणाचं आकर्षण आहे त्या प्रत्येक गिर्यारोहकाला कधी ना कधीतरी एव्हरेस्ट शिखर सर करण्याचं स्वप्न पडत असेल.नामचे बाजारच्या त्या तेनझिंग मेमोरिअल मध्ये रेखाटलेला तेनझिंग नॉरगे आणि एडमंड हिलरीचा एव्हरेस्टचं शिखर सर करून इतिहास निर्माण करण्यापर्यंतचा प्रवास रोमांचक तर आहेच

आधी लगीन कोंढाण्याचे...

  आधी लगीन कोंढाण्याचे....  कळलंच असेल ना तुम्हाला,मी कशाबद्दल बोलतेय ते....नाही,माहितेय मला की सिंहगड काही कोणाला नवीन नाही,उलट सिंहगड आणि तानाजी हे एक अद्वितीय समीकरण आहे.माझा लेक अगदी लहान म्हणजे साधारण त्याला बोलता यायला लागल्यापासून त्याला इतिहासातल्या गोष्टी सांगितल्या की नेहमी विचारायचा ,"बाबा,खरंच हे सगळं आहे का ?".अशीच एकदा तानाजीची गोष्ट सांगितल्यावर तो इतका भारावून गेला होता की," मला आत्ता म्हणजे आता सिंहगल पाहायचाय,मला घेऊन चला.. ," म्हणून त्याने आमच्या नाकीनऊ आणले होते.तेव्हाही सिंहगडाला वरपर्यंत गाडीने जाता येत असे म्हणून आम्हीही त्याचं बोलणं मनावर घेऊन मुलांना अति उत्साहाने सिंहगड दाखवायला घेऊन गेलो होतो. पण आमचं दुर्दैव म्हणा नाहीतर सुदैव,त्यावर्षी गडापर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या दुरुस्तीचं काम सुरु असल्यामुळे गाडीने वरपर्यंत जाता येणारा रस्ता बंद होता.म्हणजे गड पायी चढून जाणं हा एकमेव पर्याय आमच्यासमोर होता.दहा वर्षांची लेक तर गड चढेल पण लेकाचं काय करायचं,जेमतेम पाच वर्षांचा तो,त्याचं वय पाहता तो पायी गड चढू शकेल हे जरा अशक्यच वाटत होतं. त्यामुळे आता