Skip to main content

Posts

देवभूमी

                                            देवभूमी                        यंदाच्या कोरोना विषाणूच्या जागतिक महासंकटाने बर्‍याचशा उद्योगधंद्यांवर विशेषतः सेवा क्षेत्रावर फारच दुस्तर परिणाम झाला. सूक्ष्म आणि लघु उद्योग तर जवळपास बंदच पडले.सेवा क्षेत्रातली अशीच दोन अत्यंत महत्वाची क्षेत्रं  म्हणजे आतिथ्य उद्योग आणि पर्यटन उद्योग , ज्यांना सगळ्यात मोठा फटका यंदाच्या ऐन पर्यटनाच्या हंगामात  ह्या साथीमुळे सोसावा लागलाय.ह्या दोन्ही क्षेत्रांना पुन्हा त्यांचा सूर गवसायला किती वेळ जाईल ह्याचा अदमास बांधता येणं जरा कठीणच. मग अशा बिकट परिस्थितीत , महत्प्रयासाने वर्षानुवर्षे बांधून ठेवलेले ग्राहक आणि कमावलेला गल्ला हातचे निसटू नयेत ह्यासाठी विमान वाहतूक तसचं ट्रॅवल आणि टूर कंपन्या आपापलं अस्तित्व व  ग्राहकांचा भटकंतीमधला रस  टिकून रहावा म्हणून  वेगवेगळ्या शकला आणि क्लृप्त्या लढवतायत .ह्या सगळ्या...

पिझ्झा,पास्ता आणि कोरोना...

पिझ्झा , पास्ता आणि कोरोना... “कोरोना” नामक एक अदृश्य विषाणू काय आला आणि त्याने पाहता पाहता अख्खं जग आपल्या विळख्यात घेतलं , एखाद्या अजगरासारखं.त्यात स्वतःला धनाढ्य आणि बलाढ्य म्हणवणार्‍या भल्या भल्या देशांची , यूरोप मधल्या विशेषतः इटली , जर्मनी , फ्रांस आणि त्याच बरोबरीने अमेरिकेची , ह्या विषाणूची साथ आवरता आवरता अक्षरशः भंबेरी उडालीय. ह्या साथीला आवरण्यासाठी थोड्या फार प्रमाणात प्रभावी ठरण्याचीअपेक्षा असलेलं H ydroxychloroquine मिळवण्यासाठी एरव्ही कृष्णवर्णीय म्हणून भारतीयांना कसपटा समान लेखणार्‍या वर्णभेदाच्या पुरस्कर्त्या यूरोप , अमेरिकेला मदतीसाठी भारताचे पाय धरण्याची वेळ आली . भारताने मानवीय हेतूने तात्काळ ह्या औषधाच्या निर्यातीवरचे निर्बंध काही अंशी शिथिल करून जवळपास पंचवीस देशांना ह्या औषधाचा पुरवठा   केलादेखील पण ह्या औषधासाठी भारताला धमकी वजा विनवणी करणार्‍या अमेरिकेला , धमकी न देता सुद्धा   भारताने ही मदत माणुसकीला जागून अशीही पुरवलीच असती हे मात्र दुर्दैवाने समजलं नाही कारण   सेवाभाव हा खरं तर आपल्या भारतीयांचा अंगीभूत गुण आहे , अगदी रक्तात...

God’s Own Country

God’s Own Country एखाद्या नैसर्गिक संकटाचा कोणत्याही देशावर किंवा राज्यावर होणारा दूरगामी परिणाम पडताळता येणं तसं कठीणच. तसचं काहीसं केरळच्या बाबतीत म्हणता येईल.अलीकडेच काही महिन्यांपूर्वी केरळला जाणं झालं.वास्तविक पाहता एकंदरीत पर्यटकांचा केरळकडचा ओढा पाहता फक्त पंधरा दिवस आधी विचार करून आम्हाला कुठे आश्रय मिळेल असं जरा दुरापास्तच वाटत होतं , तेही ऐन दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये.ऑक्टोबर ते डिसेंबर हा केरळचा पर्यटन हंगामच खरा तर त्यामुळे जर का केरळमध्ये काही थारा नाही मिळाला तर आम्ही आमचा बॅकअप प्लान सुद्धा तयार ठेवला होता.पण अहो आश्चर्यम ! आम्ही जसा बेत आखला होता तसं तसं त्या त्या ठिकाणी आमची सोय होत गेली अगदी अनपेक्षितपणेच ...अर्थात ती का झाली ते आम्हाला तिथे पोहोचल्यावरच लक्षात आलं. थिरुअनंथपूरमच्या एअरपोर्टवर उतरलो आणि एकही ओला / उबर मोकळी सापडायला तयार नाही. मग  रिक्षाशिवाय पर्यायच नव्हता. तिथे साधारणपणे आपल्याकडचा सांगली-सातारा-कोल्हापूरकडचा छकडा किंवा वढाप म्हणता येईल इतक्या आकाराच्या रिक्षा राजरोस रस्त्यांवर धावताना दिसतात.अशाच रिक्षाच्या शोधात असताना आमची गाठ पडली...

दुबई --- एक मायाजाल

दुबई --- एक मायाजाल मागच्या वर्षी जॉर्जीयाला जाता येता दोन्ही वेळी आमचा शारजा एअर पोर्टवर बराच मोठा stop - over  होता.तेव्हा सवडच सवड असल्यामुळे साहजिकच आमच्या दुबईतल्या वास्तव्यातल्या बर्‍याच आठवणी शारजाच्या निमित्त्याने ताज्या झाल्या.“ दुबई ” असं नुसतं उच्चारलं जरी तरी आपल्या डोळ्यांसमोर येतं ते एक चकचकीत असं अरबी राष्ट्र .खूप चमक धमक असलेलं. आपल्या मनांत वर्तमानपत्रांमधल्या अवाजवी प्रसिद्धी दिल्या गेलेल्या दुबई शॉपिंग फेस्टिवलच्या जाहिराती , तिथला सोने बाजार , अरबी अत्तरं , सगळ्यांना नादावणारा अरबी लावण्यवतीचा Belly Dance असं बरंच काही  ऐकीव क्षणार्धात डोळ्यांसमोर तरळून जातं.त्यामुळे दुबई म्हटलं की फक्त लखलखाट असं समीकरण डोक्यात बसलेलं आहे.ह्या सगळ्यामुळे जसं एकदा तरी ताज महाल नाही तर यूरोप पाहावं असं आपल्या मनात असतं अगदी तसचं आयुष्यात एकदा तरी दुबई शॉपिंग फेस्टिवलच्या निमित्त्याने दुबई पाहता यावं असं आपल्या बकेट लिस्ट मध्ये असतं. काही वर्षांपूर्वी मनोजच्या म्हणजे माझ्या नवर्‍याच्या नोकरीनिमित्त्याने काही वर्षांसाठी दुबईत राहण्याचा योग आला.त्याने जेव्हा दुबईत नोकरी ...

राधे राधे ...

राधे राधे ... आज फेसबूकने “ your memories nine years ago” असं म्हणून आठ नऊ वर्षांपूर्वीचा फोटो टाकला आणि मन साहजिकच नऊ वर्ष मागे भूतकाळात जाऊन पोहोचलं....आमच्या दिल्ली-आगरा ट्रीपमध्ये ! सहा एक वर्षांचा असेल त्यावेळी माझा धाकटा लेक.एकामागून एक झपाट्याने तो   Tintin,Archie,Tinkle,Sherlock Holmes, Agatha Christie बरोबरच आपल्या रामायण , महाभारतातल्या पौराणिक कथा आणि शिवाजी महाराजांचा इतिहास फार रस घेऊन आणि गोडीने अमर चित्रकथांच्या माध्यमातून वाचत होता. त्याचवेळी टीव्हीवरसुद्धा नेमकी छत्रपती शिवाजी महाराजांवरची एक मालिका प्रक्षेपित होत असे ज्यात शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका दाखवली होती.रोज रात्री झोपताना मुलांचा गोष्टी ऐकण्याचा रतीब असे . त्याचा बाबा  इतिहासातलं रोज एक नवीन पान त्याच्यासमोर गोष्टीरूपाने उलगडत असे.त्यामुळे इतिहास त्याच्यासाठी एक कंटाळवाणा विषय न राहता अतिशय  रंजक झाला होता आणि इतिहासबाबतचं त्याचं कुतूहल एकंदरीतच अगदी शिगेला पोहचलं होतं.त्याच्या डोक्यात घोळणार्‍या असंख्य प्रश्नांना आम्ही आमच्या परीने कितीही समाधानकारक उत्तरं दिली तरी त्याच...