Skip to main content

Posts

ती फुलराणी

  ती फुलराणी    "हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणांच्या मखमालींचे" "त्या सुंदर मखमालींवरती,  फुलराणी ती खेळत होती" बालकवींच्या कवितेतल्या ह्या ओळी,आपल्यासारख्या काँक्रीटच्या जंगलात राहणाऱ्या लोकांसाठी तरी किमान फक्त स्वप्नंच.ही फुलराणी प्रत्यक्षात असेल अशी साधी शंकासुद्धा कधी आली नाही.पण एखादी गोष्ट करायची ठरवली की त्याच्या हात धुवून मागे लागणं ही माझी वाईट खोड.असंच काहीसं झालं होतं माझं " Valley Of Flowers " च्या बाबतीत.हिमालय आधीच माझा  जिव्हाळ्याचा विषय.त्यात ईशान्य भारताची तोंडओळख झाल्यापासून तर जेव्हा संधी मिळेल तेव्हा  हिमालयाचे वेगवेगळे रंग उलगडून पाहण्याचा आताशा छंदच जडलाय जीवाला.उत्तराखंड नैसर्गिक आणि आध्यात्मिक अशा दोन्ही अंगांनी समृद्ध असल्यामुळे उत्तराखंडमध्ये फिरणं हा कायमच एक मौलिक अनुभव असतो.खटकते ती फक्त तिथल्या स्थानिक लोकांची आणि  आलेल्या पर्यटकांचीही  स्वच्छतेबाबतची कमालीची अनास्था. मुळातच जातिवंत भटकी, त्यामुळे...

ज़न्नत-ए-कश्मीर (भाग १)

  ज़न्नत-ए-कश्मीर (भाग १) "Travel is the only expense that makes you rich", अशी एक उक्ती आहे.....आणि ते खरंही आहे.आमच्या प्रत्येक सहलींमधले अनुभव,त्यात भेटणाऱ्या व्यक्ती कायमच आमचं जगणं समृद्ध करत आले आहेत.आपल्या प्रसारमाध्यमांवर बेंबीच्या देठापासून ओरडून ओरडून दाखवल्या जाणाऱ्या मथळ्यांमध्ये फारसं काही तथ्य नसतं हे जरी माहित असलं तरी रोज वर्तमानपत्रात छापून येणाऱ्या काश्मीरबद्दलच्या उलटसुलट खबरांमुळे आणि मागच्या महिन्यात झळकलेल्या "काश्मीर फाइल्स"ने काश्मीरची सुट्टी ठरवताना काहीसं कुतूहल,उत्सुकता आणि काहीशा भीतीने आच्छादलेल्या विचारांचा एक अजबच कोलाहल होता डोक्यात.वास्तविक पहाता दरवर्षी लाखो पर्यटक काश्मीरमध्ये हजेरी लावतात,म्हणजे काश्मीर " याचि देही याचि डोळा " पाहण्याची मनीषा उराशी बाळगणारे आम्ही खरंतर काही एकटे नव्हे तरीसुद्धा एकंदरीतच "सुरक्षा" ही आमच्यासाठी एक चिंतेची बाब होती.पण खूप विचारविनिमयाअंती काश्मीरलाच सुट्टीला जाण्यावर सगळ्यांनी शिक्कामोर्तब केलं तेव्हा मात्र पिंजून काढण्यासारखी हटके ठिकाणं हुडकण्यापासून घेऊन...

ईशान्यरंग (भाग -१) - सफर लामांच्या भूमीची

  ईशान्यरंग (भाग -१) सफर लामांच्या भूमीची  हिमालय एक व्यसन आहे.जो एकदा हिमालयात फिरायला गेला तो परत परत हिमालयाच्या वेगवेगळ्या वाटा  चोखाळत राहतो. बरं त्याचे रंग तरी किती म्हणावे.काश्मीर मध्ये तो शृंगारिक दिसतो,हिमाचलमध्ये रांगडा,उत्तराखंड मध्ये सात्विक तर ईशान्येला निसर्गसुंदर.काही वर्षांपूर्वी सैन्यात असलेल्या माझ्या शाळेतल्या वर्गमित्राने फेसबुकवर  एक फोटो  पोस्ट केला,खरंतर त्याने सहज म्हणून तो फोटो पोस्ट केला पण त्या जागेच्या सौंदर्याने मी इतकी मोहून गेले की ती जागा मनात आणि डोक्यात कोरली गेली ती कायमची,भारत चीन सीमेवरचं नितांत सुंदर असं अरुणाचल प्रदेश मधलं तवंग.  वीरमरण आलेल्या  आपल्या  २४२०  भारतीय  जवानांच्या सांडलेल्या रक्ताने पावन झालेली अशी ही  लामांची भूमी,अरुणाचल प्रदेश  ...... खूप काही इतिहास आहे तवंगला त्यामुळे लिहिण्यासारखं आणि जाणून घेण्यासारखंही बरंच काही,लिहावं तितकं थोडकं.पण सगळ्यात महत्त्वाचं जाणून घेण्यासारखं जर का काही असेल तर ते आहे १९६२ च्या भारत चीन युद्धाच्या अंगावर काटा आणणाऱ्...

दख्खनचं गतवैभव

  दख्खनचं गतवैभव  कधी कधी उत्स्फूर्तपणे घडणाऱ्या गोष्टी अविस्मरणीय आनंद देऊन जातात.दोन वर्षांपूर्वी आम्ही हम्पी बदामीला जाण्यासाठी खूप हाणामाऱ्या केल्या पण काही हाताशी लागलं नाही.हम्पीमधलं एकही हॉटेल आम्हा पामरांना आश्रय द्यायला तयार नव्हतं,शेवटी आम्ही हंपी बदामीचा नाद सोडून दुसरंच ठिकाण शोधून तिथला इतिहास पालथा घातला.मागचे दोन वर्षं कोरोनाने बाकी काही चांगलं काम केलं असेल नसेल पण हौशी पर्यटकांना विनासायास हॉटेल बुकिंग मिळण्याची तजवीज नक्कीच केली. दोन वर्षांपूर्वी जिथे एक हॉटेल आम्हाला थारा द्यायला तयार नव्हतं तिथे ह्यावर्षी ओमिक्रोनच्या आलेल्या नव्या लाटेचा प्रसादच म्हणा ना की आम्हाला म्हणाल त्या हॉटेलमध्ये आम्ही ठरवू तितके दिवस बुकिंग मिळत होतं.आज मितीला कोरोनापूर्व काळात असलेल्या संख्येच्या जेमतेम २० टक्के पर्यटक हंपीमध्ये येत असल्यामुळे पर्यटनातून मिळणाऱ्या उत्पन्नातून उदारनिर्वाह चालवणाऱ्या स्थानिक लोकांना कोरोनाचा खरंच खूप जबरदस्त फटका बसलाय हैत शंका नाही.एरव्हीच्या पर्यटनाच्या हंगामात जरुरीपेक्षा जास्त गजबजलेली इथली सगळी पर्यटन स्थळं आ...

गंध गुजरातचा (भाग २)

गंध गुजरातचा (भाग २)   साधारण  तीन चार महिने उलटले की आमच्यासारख्या भटक्यांच्या तळपायाला खरी तर खाजच यायला सुरूवात होते आणि त्यात गेले दोन वर्ष कोरोनाच्या कृपेने तब्बल जवळपास दोन वर्ष आम्हाला भटकंती उपास घडला.म्हणजे तुम्हाला आमच्या दैनेची कल्पना द्यायचीच असेल तर एखाद्या अट्टल बेवड्याचं उदाहरण पुरेसं आहे. त्याला जर त्याचा रोजचा दारूचा रतीब मिळाला नाही तर त्याची जी तगमग होत असेल तशीच काहीशी तगमग आमची ह्या दोन वर्षांत झाली असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही.त्यामुळे परीक्षा संपण्याचा आणि लॉकडाऊन उघडण्याचाच अवकाश होता की आम्ही पहिली संधी साधून बाहेर पडलोच.हाताशी जर का अगदीच मोजका वेळ असेल तर खाण्यापिण्याची चंगळ आणि अत्यंत सुस्थितीतले रस्ते ह्या दोन प्रमुख कारणांमुळे आपलं "सख्खे शेजारी" राज्यं आमच्यासाठी नेहमीच "गो टू प्लेस "असते.मला अगदी ठळकपणे  आठवतंय,आमच्या लहानपणी गुजरातचा कधीच एक पर्यटन स्थळ म्हणून विचारही होत नसे. पण काही वर्षांपूर्वी अमिताभ बच्चननं ह्...