Skip to main content

Posts

पावनखिंड

 पावनखिंड   काही संज्ञा रूढार्थाने आपल्यासारख्या सर्वसामान्यांमध्ये अशा रूजतात की जसे काही ते समानार्थी शब्दच असावेत.अगदी उदाहरणादाखलच सांगायचं तर एखाद्या मूळ दस्तावेजाची नक्कल म्हणजे झेरॉक्स किंवा मिनरल वॉटर म्हणजे बिस्लेरी इत्यादी.वास्तविक पाहता झेरॉक्स काय किंवा बिस्लेरी काय ह्या खऱ्या तर कंपन्या पण मूळप्रतीची नक्कल म्हणजे झेरॉक्स आणि मिनरल वॉटर मग ते कोणत्याही ब्रॅण्डचं असो लोकं सर्रास त्याला बिस्लेरीच संबोधतात.तसंच किमान सगळ्या मराठी लोकांच्या मनात,बाजीप्रभू देशपांडे म्हणजे पावनखिंड हे समीकरण कोरलेलं आहे.शीर्षकच असं आहे की ज्याला शिवकालीन इतिहासाचा पुरेसा परिचय आहे त्या कोणालाच पावनखिंडीबद्दल फार काही सांगण्याची गरज पडत नाही.सिर्फ नाम ही काफ़ी हैं..... किल्ले पन्हाळा    जवळपास चाळीस एक वर्षांपूर्वी जेमतेम दहा वर्षांची असताना पन्हाळगड चढून जाण्याची संधी मिळाली होती त्यामुळे गडाच्या आठवणी तशा खऱ्या धूसरच झालेल्या होत्या पण आठवणींचा मोहोळ मात्र होता.त्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा देण्याची एक अजब उत्कंठाही होती.अशाच उत्कंठेने काही वर्षांपूर्वी प्रतापगड पाहायला गेलो ...

सह्याद्रीच्या कुशीतला हिरा

  सह्याद्रीच्या कुशीतला हिरा "अगं कुठेतरी जाऊ या ह्या वीकेंडला,काही सुचतंय का ?"नवरोजी विचारते झाले.एरव्ही लोळून एखादा सिनेमा नाहीतर वेब सिरीज पहात किंवा एखाद्या लठ्ठ पुस्तकाच्या पानांचा वाचून चोथा करत आठवड्याच्या सुट्टीचं सार्थक करणाऱ्या अहोंकडून सहसा असा प्रस्ताव जरा अनपेक्षितच असतो त्यामुळे आधी तर माझा जबडाच पडला.मग मी एकदा स्वतःला जरा चिमटा काढून,मी आता जे ऐकलं ते नक्की खरं आहे का? ह्याची खातरजमा  करून घेतली.तिथवर "मग बघ काही सुचतंय का ते" म्हणत अहोंनी अतिशय सफाईदारपणे ती जबाबदारी माझ्या गळ्यात टाकून तिथून पोबारा केला.पण कोरोना पुरता निपटल्यापासून मागच्या दोन वर्षांचं उट्टं काढत असलेले आमच्यासारखे भटके बरेच आहेत त्यामुळे असं अगदी आयत्या वेळी कुठे काही बुकिंग मिळण्याची  शक्यता जवळपास शून्यच असते.मुंबईतून कुठेही पोहोचायचं म्हटलं तर ट्रॅफिकचा नुसता विचार केला तरी आमच्या अंगावर काटा येतो.त्यात मुंबईपासून पोहोचायला कमी जिकिरीचं आणि तरी पैसावसूल पर्याय असं काहीतरी हुडकून काढायचं म्हणजे एक दिव्यच.अगदी अलीकडच्या काळात एकामागून एक अशी दोन्ही पिल्लं घरट्यातून उडाल्यापासून...

Julley लडाख

  Julley(थँक यू) लडाख आईचं आपल्या सगळ्या लेकरांवर सारखंच प्रेम असतं असं म्हणतात पण अपवादाने नियम सिद्ध होतो तसचं काहीसं आहे लडाखचं.म्हणायला लडाखसुद्धा हिमालयाचंच लेकरू,अगदी आता आता २०१९ मध्ये केंद्रशासित प्रदेश म्हणून नवी ओळख मिळालेला लडाख काश्मीरचा खरंतर सख्खा भाऊ.पण जितकं काश्मीर ट्युलिप्स, केशर, चेरी, अक्रोड, सफरचंद, क्रॅनबेरीज, ब्लू बेरीज,ब्लॅक बेरीज अशा नानाविविध शेलकी फळंफुलं,दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या आणि झरे अशा निसर्गदत्त श्रीमंतीने समृद्ध आहे तितकीच  निसर्गाने लडाखला सावत्र वागणूक दिल्यासारखं वाटतं.त्यामुळे निसर्गसौंदर्याच्या आणि माणसांच्या मनोवृत्तीच्या मामल्यात लडाख काश्मिरच्या बरोबर विरुद्ध.अर्थात हाताची पाच बोटं सारखी नसतात तर मग हिमालयाची ही बोटं म्हणजे लेकरंसुद्धा सारखी कशी असतील.जितकं काश्मीर आपल्या ईशान्येकडच्या राज्यांसारखं निसर्गसंपन्न,हिरवंगार आणि एखाद्या लावण्यवतीसारखं वाटतं तितकंच लडाख रूक्ष,रेताड,उजाड आणि एखाद्या रंग रूपात अंमळ जास्तच डाव्या असलेल्या एखाद्या रांगड्या पुरुषासारखं वाटतं.पण २००९ मध्ये इथल्या सोनम वांगचुक नामक भूमिपुत्राच्या जीवनपटावरून प्र...

नमामि गंगे

नमामि गंगे   "मुस्कुराईये की आप लखनऊ में हैं।" लखनऊ एअरपोर्टवर पाऊल टाकता क्षणी तिथल्या भिंतीवर लिहिलेल्या ह्या वाक्याने माझं लक्ष वेधून घेतलं.ते वाचून खरंच काहीही कारण नसताना चेहऱ्यावर हसू उमटलं.वाटलं नुसतं हे वाक्य वाचून जर इतकं प्रसन्न वाटतंय तर मग लखनऊ मध्ये फिरताना किती प्रसन्न वाटेल.पण आधीच फ्लाईट उशिराने पोहोचली होती त्यामुळे अजून वेळ न दवडता पटापटा बेल्टवरून बॅगा उचलून आम्ही बाहेर आमच्यासाठी उभ्या असलेल्या टॅक्सीत बसून अयोध्येकडे निघालो. उत्तर प्रदेश भारतातलं सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेलं कृषीप्रधान राज्य.मोहोरी,ऊस आणि बटाटे इथली प्रमुख पिकं.महामार्गांच्या अगदी लगत  जर्द पिवळ्या फुलांनी आच्छादलेली लांबच लांब पसरलेली मोहोरीची हिरवीगार शिवारं डोळ्यांना गारवा देत होती.त्यात अगदी दुपारच्या दोनच्या टळटळीत उन्हातसुद्धा हवेत किंचित असलेला गारवा छान आल्हाददायक वाटत होता.अयोध्येला जाण्याच्या वाटेवर टॅक्सीत बसल्या बसल्या लहानपणी टीव्हीवर पाहिलेल्या रामराज्य,भरतभेट सारख्या ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटांमधली काही दृश्यं  झरझर डोळ्यांसमोर तरळून गेली. त्यावेळी  बऱ्याच तांत्रि...