Skip to main content

Posts

Showing posts from 2020

गण गण गणांत बोते

  गण गण गणांत बोते  काही गोष्टींचा योगच असावा लागतो असं मला फार राहून राहून वाटतं.विशेषतः देवदर्शनाच्या  बाबतीत.आपण जायचं ठरवावं आणि सगळं मनासारखं म्हणजे योजल्याप्रमाणे घडत जावं असं फार वेळा होत नाही. त्यातून सध्याच्या बिकट परिस्थितीत प्रवास करायचं धाडस करणं म्हणजे धोक्याची घंटा. खरंतर मी आणि माझा नवरा फार आस्तिकही नाही आणि नास्तिकही नाही.देवाचं मूर्तरूप आम्हाला तितकंसं मान्य नसलं तरी एक दिव्य शक्ती किंवा ऊर्जा म्हणून त्याचं अमूर्तरूप आम्हाला भावतं.त्यामुळे  फार नाही तरी क्वचित अध्येमध्ये आम्हाला असे देवदर्शनाचे झटके येत असतात.आम्हाला वावगं असतं ते फक्त दोनच गोष्टींचं आपल्याकडच्या देवस्थानांचं पावित्र्य अबाधित न ठेवणाऱ्या देवस्थानांमध्ये चालणाऱ्या व्यावसायिकिकरणाचं आणि देवस्थानाच्या ठिकाणच्या व आजूबाजूच्या परिसरातल्या कमालीच्या अस्वच्छतेचं.ह्या दोन गोष्टींमुळे देवस्थानांचं मांगल्यच हरवून जातं.  देवस्थानं आणि स्वच्छता ह्यांचा सर्वसाधारणपणे एकमेकांशी छत्तीसचा आकडा . मागच्या वर्षीपासून कारंज्याला जायचं खूप मनात होतं पण काही ना काही आडवं येत होतं. पण सध्या समाज माध्यमांवर फिरणारी  शेगाव सं

Thy Name Is England

Thy Name Is England   " काय गं माधुरी,यंदा सुट्टीला कुठे ? ",योगवर्गात जरा स्थिरस्थावर होते की नाही तो एक काकू विचारत्या झाल्या. तसं त्यांच्या माझ्या वयात अंतर बरंच असलं तरी "भटकंती" ह्या एका समान धाग्याने आमच्या  वयामधलं अंतर बाजूला ठेवून आजवर वर्षानुवर्षं आमची मैत्री घट्ट केलीय. मग काय आम्हा दोघींना तेवढंच निमित्त गप्पाष्टकांसाठी.गप्पांच्या ओघात कळलं की त्यांचा इंग्लंडच्या सुट्टीचा बेत यूके कॉन्सुलटेच्या कृपेने पुरता उधळला गेला होता. त्यामुळे काहीश्या म्हणण्यापेक्षा बऱ्याच उद्वेगल्या होत्या त्या.साहजिकच होतं म्हणा. पैसे वाया गेल्याचं दुःख तर होतंच पण व्हिसाचा अर्ज करण्याच्या किचकट सोपस्कारापासून ते सांपत्तिक स्थिती ,संशयास्पद पार्श्वभूमी असं कोणतंही सबळ कारण नसताना व्हिसा नाकारला जाण्यापर्यंत त्यांना झालेला मनःस्ताप,त्याबद्दलची चीड आणि अपेक्षाभंगाचं दुःख त्यांच्या प्रत्येक शब्दात उमटत होतं.  २००५ च्या अखेरीपर्यंत दुबईतून काढता पाय घेण्याचं आम्ही जवळपास नक्की केलं होतं. तसं दुबई मधून का कोण जाणे पण कोणताही आंतरराष्ट्रीय प्रवास फार कठीण वाटत नाही.मग आता दुबई सोडणारच

गालबोट

  गालबोट  मागच्या वर्षीच्या एप्रिलमध्ये पॅरिसचं तथाकथित सुप्रसिद्ध बॅसिलिका " Notre  Dame " आगीत होरपळून निघालं आणि साऱ्या जगात एकच हळहळ पसरली. का कुणास ठाऊक पण  मला मात्र त्याचं फारसं दुःख झालं नाही. कधी कधी त्या वास्तूचा थेट संबंध नसला तरी  प्रवासात अनपेक्षितपणे येणाऱ्या चांगल्या वाईट अनुभवांचा संबंध आपण अतिशय सोयीस्करपणे त्या त्या स्थळांशी कायमस्वरूपी जोडून मोकळे होतो आणि आपल्या सहजसुलभ  मानवी  स्वभावानुसार त्या कटू आठवणी किंवा प्रसंग आपल्या  मनावर कायमचे कोरून ठेवतो. असे घडणारे प्रसंग अकारण आपल्या प्रवासाच्या आनंदाला गालबोट लावतात. ते ही अगदी अनपेक्षितपणे. ह्या " Notre Dame " ला लागलेल्या आगीने माझ्या त्या आठवणीवर नकळत हळूच फुंकर घातली. वास्तविक ह्या Notre Dame चा थेट असा काहीच संबंध नव्हता त्या प्रसंगाशी खरं  पण Notre Dame   आम्हाला कायमचं लक्षात राहिलं  ते त्याच प्रसंगामुळे.आमच्या आतापर्यंतच्या युरोप प्रवासामध्ये जनमानसात प्रिय असलेले पण मला फारसे न भावलेले असे दोन देश म्हणजे फ्रान्स आणि इटली.निसर्गसौंदर्यात अजिबातच हे देश कुठल्याही अंशाने उणे नाहीत पण उणे आ

रंगिलो राजस्थान

रं गि लो रा ज स्था न   बऱ्याचदा आपल्याला स्वतःची पुरेशी ओळख नसते. पण काही वेळेस अशी संकटं किंवा असा पेच समोर येऊन उभा ठाकतो की आपला आपल्याला नव्याने शोध घ्यावाच लागतो. तसंच काहीसं आपल्या सगळ्यांचं ह्या कोरोनाच्या महासंकटात झालंय.कित्येक गोष्टी आपण स्वबळावर किंवा स्वकौशल्यावर सहज करू शकतो ह्याचा शोध आपल्या सगळयांनाच आता आताशा लागतोय. मग अगदी घरच्या घरी लादी पाव करणं असो किंवा मग  प्रवास. " इतके दिवस आपण का बरं प्रयत्न करून पहिला नाही? "असा प्रश्न पडतो. लॉकडाऊनने उबलेली लोकं लॉकडाऊन नंतरच्या काळात भारतातल्या अशा कधी न पाहिलेल्या आणि ऐकलेल्या स्थळांना भेटी देण्याच्या आशेवर आतापासून बसलेले आहेत आणि तेही स्वबळावर.सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून कोणत्याही ग्रुप टूरचा  पर्याय निवडण्याऐवजी वैयक्तिकरित्या प्रवास करण्याकडे जाणवणारा लोकांचा वाढता कल लक्षात घेऊन बऱ्याच प्रथितयश टूर कंपन्यांनी आतापासूनच ग्राहकांना लुभावणारे अनेक व्यक्तिगत पर्याय उपलब्ध करून देण्याच्या उद्देश्याने आपली कंबर कसलीय.त्यामुळे येणाऱ्या नजीकच्या काळात आपल्याला स्वतःबद्दल अजूनच नवनवीन शोध लागले तर आश्चर्य वाटाय

दख्खनच्या जंगलवाटा

दख्खनच्या जंगलवाटा   कधीकधी काही ठिकाणं अगदी योगायोगानेच पहिली जातात.नाही तर मुद्दाम वाट वाकडी करून ती पाहायला जाण्याचा आपण सहसा विचार करत नाही किंवा करणारही नाही कदाचित.नेमकं असंच काहीसं झालं जेव्हा आम्ही कूर्ग पहायचं ठरवलं. क्लब महिंद्राची मेम्बरशिप घेतल्यापासून आम्ही त्यांच्या कूर्गच्या प्रॉपर्टीचं बरंच कौतुक ऐकून होतो त्यामुळे ती प्रॉपर्टी पाहण्याचं कुतूहल तर होतंच,पण एखादं ठिकाण ठरवल्यावर आसपासची फारशी वाट न चोखाळली गेलेली ठिकाणं हुडकून काढणं आता काहीसं सवयीनेच होतं. त्यामुळे तेव्हा मसिनागुडी आणि येरकऊडचा समावेश आपसुकच झाला.ठिकाण कोणतंही असू दे,भारतात किंवा भारताबाहेर आमचा बराचसा भर हा "Being Glocal" वर असतो.ह्या तत्त्वाला अनुसरून आम्ही प्रत्येक ठिकाणी खाजगी वाहन वापरण्याऐवजी किंवा भाड्याने घेण्याऐवजी शक्य तितकं आणि शक्य असेल तिथे,त्या भागात वापरल्या जाणाऱ्या आणि उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाहतुकीची माध्यमं वापरण्याचा प्रयत्न करतो आणि पसंतही करतो ज्याच्यामुळेआम्हाला भटकंतीचा  खराखुरा   आनंद मिळतो. याव्यतिरिक्त तिथल्या स्थानिक लोकांशी संवाद साधणं,त्यांचं जीवन जवळून पहाण

बकेट लिस्ट (भाग २)

बकेट लिस्ट (भाग २) इतक्या अडचणींची शर्यत पार केल्यानंतर अगदी प्रवासाला निघायच्या दिवशीपर्यंत सगळं काही यथासांग पार पडलंय आणि आम्ही ठरवल्याप्रमाणे खरोखरच निघालोय ह्यावर विश्वास बसत नव्हता.का कोणास ठाऊक , एक अनाहूत भीती होती मनात .पण अॅमस्टरडॅमला इमिग्रेशन मधून सुखरूप बाहेर पडलो आणि जीव भांड्यात पडला.पूर्व  यूरोपातल्या आणि पश्चिम यूरोपातल्या देशांच्या संस्कृतीतही बरीच तफावत आहे.पश्चिम यूरोपच्या जीवनशैलीमध्ये असलेला भपका आणि झगझगाट पूर्व यूरोप मध्ये कुठेही जाणवत नाही.पण तरीही अॅमस्टरडॅम मध्ये पाऊल ठेवल्या ठेवल्या इंग्लंडच्या आणि बाकी यूरोपियन देशांच्या संस्कृती मध्ये असलेला  फरक  नजरेतून निसटला नाही.आम्ही  इंग्लंड ला गेलो होतो तेव्हा मुलं अनुक्रमे वयवर्ष सहा आणि एक इतकी लहान होती.इंग्लंडमध्येही लोकं संध्याकाळी साडे पाच पर्यन्त कमालीची व्यस्त असतात.त्यांच्या रोजच्या आयुष्यातली ही व्यग्रता आम्हाला मेट्रो स्टेशन्स वर ऑफिस अवर्स मध्ये मेट्रो गाठण्याच्या लगबगीतून  जाणवायची.पण त्या घाईतही आमची दोन लहान मुलांना हाताशी आणि कडेवर सांभाळत सामान वाहून नेण्याची झटापट  पाहून हमखास जाणारा येणारा

बकेट लिस्ट (भाग – १)

बकेट लिस्ट (भाग – १) अं..हं ..हे माधुरी दीक्षितच्या त्या एकमेव मराठी सिनेमा बद्दल बोलत नाहीये मी. आपल्या मनातल्या बकेट लिस्टबद्दल बोलतेय मी .आपली बकेट लिस्ट तशी म्हटलं तर संपतच नाही कधी आणि ती प्रत्येकाची वेगवेगळी असते , पण तरीही कोणाच्या  बकेट लिस्ट मध्ये यूरोप टूर अग्रक्रमावर नाही असा एक माणूस मिळणं अशक्य. यूरोप म्हटलं की लागलीच दोनच गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात त्यातली पहिली म्हणजे “ऍन  ईवनिंग इन पॅरिस  “मधली आयफेल टॉवर समोर नाटकी लाजत , मुरडत चालणारी  शर्मिला टागोर आणि दुसरी स्वित्झर्लंडच्या हिरवळीवर फुलपाखरासारखी मनसोक्त बागडणारी “चाँदनी “ म्हणजे श्रीदेवी. त्यामुळे यूरोप म्हणजे “स्वित्झर्लंड आणि फ्रांस “ हे आपल्या सगळ्यांसाठी यूरोप  साठीचे  समानार्थी शब्द झालेले आहेत. साहजिकच इंग्लंड पलीकडचा यूरोप जेव्हा आम्ही पाहायचं ठरवलं तेव्हा सुरुवात ह्याच दोन देशांपासून होणं स्वाभाविक होतं , पण फक्त इतकंच पाहणं आमच्या बकेटलिस्टवर अन्याय होता.बाजारात एखादी भाजी आणायला म्हणून जावं आणि ताज्या टवटवीत भाज्या-फळांनी  फुललेला  बाजार पाहिल्यावर आणखी एक दोन उचलायचा मोह न आवरता यावा तसं  काहीसं