भेट जॉर्जियाची स्मरते ….. ( भाग २) अतिशय नाट्यमय पद्धतीने जॉर्जियात प्रवेश झाल्यावर आम्ही लागलीच पुढल्या कार्यक्रमाला लागलो . टॅक्सी पकडून हॉटेल गाठलं. तसा १२ एक तासांचा प्रवास झाल्यामुळे आम्ही बऱ्यापैकी थकलो होतो , खरं तर तो थकवा शरीराचा कमी आणि मनाचा जास्त होता.पण सकाळपर्यंत ही मनाची आणि शरीराची मरगळ जाऊन त्याची जागा नवीन चैतन्याने घेतली होती. आता आम्ही आमच्या परीने जॉर्जिया पिंजून काढायला पूर्ण तयार होतो , itinerary तर हाताशी होतीच. हॉटेलच्या मदतीने आम्ही सिग्नाघीला जाण्यासाठी टॅक्सी बुक केली.सगळ्यात विनोदाचा भाग हा ...