भेट जॉर्जियाची स्मरते ….. ( भाग २) अतिशय नाट्यमय पद्धतीने जॉर्जियात प्रवेश झाल्यावर आम्ही लागलीच पुढल्या कार्यक्रमाला लागलो . टॅक्सी पकडून हॉटेल गाठलं. तसा १२ एक तासांचा प्रवास झाल्यामुळे आम्ही बऱ्यापैकी थकलो होतो , खरं तर तो थकवा शरीराचा कमी आणि मनाचा जास्त होता.पण सकाळपर्यंत ही मनाची आणि शरीराची मरगळ जाऊन त्याची जागा नवीन चैतन्याने घेतली होती. आता आम्ही आमच्या परीने जॉर्जिया पिंजून काढायला पूर्ण तयार होतो , itinerary तर हाताशी होतीच. हॉटेलच्या मदतीने आम्ही सिग्नाघीला जाण्यासाठी टॅक्सी बुक केली.सगळ्यात विनोदाचा भाग हा की इंग्लिशमध्ये उत्तर न देता येण्याच्या ज्या मुद्द्यावरून आमच्यादेखत त्या भारतीय कुटुंबाला जॉर्जियात प्रवेश नाकारला गेला होता, त्या खुद्द जॉर्जियन्सना मात्र इंग्लिशचा फार गंध नाही.मोजक्या व्यवसायातील लोकांना कामचलाऊ इंग्लिश बोलता येतं. त्यामुळे आम्ही जी टॅक्सी बुक केली