आम्ही कैलासी - अनुभव सरकारी यात्रेचा (भाग ३) दुसऱ्या दिवशी सकाळी साडे सहा वाजता लिपू पास ओलांडून चीनमध्ये प्रवेश करायचा होता.ह्याआधी २०१९ पर्यंत नारायण आश्रम ते लिपू पास हे अंतर पायी कापायला एक आठवडा लागत असे आता लिपू पास पर्यंत जरी पक्का रास्ता बांधलेला नसला तरी लिपू पासच्या आधी अर्धा किलोमीटर अंतरापर्यंत ट्रॅक्सने जाता येतं ,पण जो काही सो कॉल्ड रस्ता आहे त्याला रस्ता म्हणायचं का असा प्रश्न. नाभीडांग ते लिपू पास अंतर होतं खरंतर सात आठ किमीचं पण इतक्या कमी अंतरात सुद्धा एक हाड जागेवर राहील तर शपथ. गुंजीतल्या ITBP चे जवान आम्ही सगळे सुरक्षितपणे लिपू पास ओलांडून भारताची सीमा पार करेपर्यंत आम्हाला सोबत करणार होते , नियमाप्रमाणे एक रुग्णवाहिकासुद्धा आमच्या ताफ्याबरोबर होतीच.सीमेवर ITBP च्या जवानांनी आम्हाला सुरक्षितपणे चिनी हद्दीत प्रवेश दिला आणि त्यांना निरोप देऊन आम्ही भारताची सीमा ओलांडली. सीमेवर चिनी पोलीस आमच्या दस्तावेजांची छाननी करण्यासाठी आधीच वर येऊन थांबले होते. चिनी सरकारचा टूर कोऑर्डीनेटर पारंपारिक तिबेटी पांढरे गमचे घेऊन स्वागतासाठी ...