Skip to main content

Posts

Showing posts from 2023

आधी लगीन कोंढाण्याचे...

  आधी लगीन कोंढाण्याचे....  कळलंच असेल ना तुम्हाला,मी कशाबद्दल बोलतेय ते....नाही,माहितेय मला की सिंहगड काही कोणाला नवीन नाही,उलट सिंहगड आणि तानाजी हे एक अद्वितीय समीकरण आहे.माझा लेक अगदी लहान म्हणजे साधारण त्याला बोलता यायला लागल्यापासून त्याला इतिहासातल्या गोष्टी सांगितल्या की नेहमी विचारायचा ,"बाबा,खरंच हे सगळं आहे का ?".अशीच एकदा तानाजीची गोष्ट सांगितल्यावर तो इतका भारावून गेला होता की," मला आत्ता म्हणजे आता सिंहगल पाहायचाय,मला घेऊन चला.. ," म्हणून त्याने आमच्या नाकीनऊ आणले होते.तेव्हाही सिंहगडाला वरपर्यंत गाडीने जाता येत असे म्हणून आम्हीही त्याचं बोलणं मनावर घेऊन मुलांना अति उत्साहाने सिंहगड दाखवायला घेऊन गेलो होतो. पण आमचं दुर्दैव म्हणा नाहीतर सुदैव,त्यावर्षी गडापर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या दुरुस्तीचं काम सुरु असल्यामुळे गाडीने वरपर्यंत जाता येणारा रस्ता बंद होता.म्हणजे गड पायी चढून जाणं हा एकमेव पर्याय आमच्यासमोर होता.दहा वर्षांची लेक तर गड चढेल पण लेकाचं काय करायचं,जेमतेम पाच वर्षांचा तो,त्याचं वय पाहता तो पायी गड चढू शकेल हे जरा अशक्यच वाटत होतं. त्यामुळे आता

पावनखिंड

 पावनखिंड   काही संज्ञा रूढार्थाने आपल्यासारख्या सर्वसामान्यांमध्ये अशा रूजतात की जसे काही ते समानार्थी शब्दच असावेत.अगदी उदाहरणादाखलच सांगायचं तर एखाद्या मूळ दस्तावेजाची नक्कल म्हणजे झेरॉक्स किंवा मिनरल वॉटर म्हणजे बिस्लेरी इत्यादी.वास्तविक पाहता झेरॉक्स काय किंवा बिस्लेरी काय ह्या खऱ्या तर कंपन्या पण मूळप्रतीची नक्कल म्हणजे झेरॉक्स आणि मिनरल वॉटर मग ते कोणत्याही ब्रॅण्डचं असो लोकं सर्रास त्याला बिस्लेरीच संबोधतात.तसंच किमान सगळ्या मराठी लोकांच्या मनात,बाजीप्रभू देशपांडे म्हणजे पावनखिंड हे समीकरण कोरलेलं आहे.शीर्षकच असं आहे की ज्याला शिवकालीन इतिहासाचा पुरेसा परिचय आहे त्या कोणालाच पावनखिंडीबद्दल फार काही सांगण्याची गरज पडत नाही.सिर्फ नाम ही काफ़ी हैं..... किल्ले पन्हाळा    जवळपास चाळीस एक वर्षांपूर्वी जेमतेम दहा वर्षांची असताना पन्हाळगड चढून जाण्याची संधी मिळाली होती त्यामुळे गडाच्या आठवणी तशा खऱ्या धूसरच झालेल्या होत्या पण आठवणींचा मोहोळ मात्र होता.त्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा देण्याची एक अजब उत्कंठाही होती.अशाच उत्कंठेने काही वर्षांपूर्वी प्रतापगड पाहायला गेलो होतो,त्यावेळी लहानप

सह्याद्रीच्या कुशीतला हिरा

  सह्याद्रीच्या कुशीतला हिरा "अगं कुठेतरी जाऊ या ह्या वीकेंडला,काही सुचतंय का ?"नवरोजी विचारते झाले.एरव्ही लोळून एखादा सिनेमा नाहीतर वेब सिरीज पहात किंवा एखाद्या लठ्ठ पुस्तकाच्या पानांचा वाचून चोथा करत आठवड्याच्या सुट्टीचं सार्थक करणाऱ्या अहोंकडून सहसा असा प्रस्ताव जरा अनपेक्षितच असतो त्यामुळे आधी तर माझा जबडाच पडला.मग मी एकदा स्वतःला जरा चिमटा काढून,मी आता जे ऐकलं ते नक्की खरं आहे का? ह्याची खातरजमा  करून घेतली.तिथवर "मग बघ काही सुचतंय का ते" म्हणत अहोंनी अतिशय सफाईदारपणे ती जबाबदारी माझ्या गळ्यात टाकून तिथून पोबारा केला.पण कोरोना पुरता निपटल्यापासून मागच्या दोन वर्षांचं उट्टं काढत असलेले आमच्यासारखे भटके बरेच आहेत त्यामुळे असं अगदी आयत्या वेळी कुठे काही बुकिंग मिळण्याची  शक्यता जवळपास शून्यच असते.मुंबईतून कुठेही पोहोचायचं म्हटलं तर ट्रॅफिकचा नुसता विचार केला तरी आमच्या अंगावर काटा येतो.त्यात मुंबईपासून पोहोचायला कमी जिकिरीचं आणि तरी पैसावसूल पर्याय असं काहीतरी हुडकून काढायचं म्हणजे एक दिव्यच.अगदी अलीकडच्या काळात एकामागून एक अशी दोन्ही पिल्लं घरट्यातून उडाल्यापासून