बकेट लिस्ट (भाग २) इतक्या अडचणींची शर्यत पार केल्यानंतर अगदी प्रवासाला निघायच्या दिवशीपर्यंत सगळं काही यथासांग पार पडलंय आणि आम्ही ठरवल्याप्रमाणे खरोखरच निघालोय ह्यावर विश्वास बसत नव्हता.का कोणास ठाऊक , एक अनाहूत भीती होती मनात .पण अॅमस्टरडॅमला इमिग्रेशन मधून सुखरूप बाहेर पडलो आणि जीव भांड्यात पडला.पूर्व यूरोपातल्या आणि पश्चिम यूरोपातल्या देशांच्या संस्कृतीतही बरीच तफावत आहे.पश्चिम यूरोपच्या जीवनशैलीमध्ये असलेला भपका आणि झगझगाट पूर्व यूरोप मध्ये कुठेही जाणवत नाही.पण तरीही अॅमस्टरडॅम मध्ये पाऊल ठेवल्या ठेवल्या इंग्लंडच्या आणि बाकी यूरोपियन देशांच्या संस्कृती मध्ये असलेला फरक नजरेतून निसटला नाही.आम्ही इंग्लंड ला गेलो होतो तेव्हा मुलं अनुक्रमे वयवर्ष सहा आणि एक इतकी लहान होती.इंग्लंडमध्येही लोकं संध्याकाळी साडे पाच पर्यन्त कमालीची व्यस्त असतात.त्यांच्या रोजच्या आयुष्यातली ही व्यग्रता आम्हाला मेट्रो स्टेशन्स वर ऑफिस अवर्स मध्ये मेट्रो गाठण्याच्या लगबगीतून जाणवायची.पण त्या घाईतही आमची दोन लहान मुलांना हाताशी आणि कडेवर सांभाळत सामान वाहून नेण्याची झटापट पाहून हमखास जाणारा येणारा