God’s Own Country एखाद्या नैसर्गिक संकटाचा कोणत्याही देशावर किंवा राज्यावर होणारा दूरगामी परिणाम पडताळता येणं तसं कठीणच. तसचं काहीसं केरळच्या बाबतीत म्हणता येईल.अलीकडेच काही महिन्यांपूर्वी केरळला जाणं झालं.वास्तविक पाहता एकंदरीत पर्यटकांचा केरळकडचा ओढा पाहता फक्त पंधरा दिवस आधी विचार करून आम्हाला कुठे आश्रय मिळेल असं जरा दुरापास्तच वाटत होतं , तेही ऐन दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये.ऑक्टोबर ते डिसेंबर हा केरळचा पर्यटन हंगामच खरा तर त्यामुळे जर का केरळमध्ये काही थारा नाही मिळाला तर आम्ही आमचा बॅकअप प्लान सुद्धा तयार ठेवला होता.पण अहो आश्चर्यम ! आम्ही जसा बेत आखला होता तसं तसं त्या त्या ठिकाणी आमची सोय होत गेली अगदी अनपेक्षितपणेच ...अर्थात ती का झाली ते आम्हाला तिथे पोहोचल्यावरच लक्षात आलं. थिरुअनंथपूरमच्या एअरपोर्टवर उतरलो आणि एकही ओला / उबर मोकळी सापडायला तयार नाही. मग रिक्षाशिवाय पर्यायच नव्हता. तिथे साधारणपणे आपल्याकडचा सांगली-सातारा-कोल्हापूरकडचा छकडा किंवा वढाप म्हणता येईल इतक्या आकाराच्या रिक्षा राजरोस रस्त्यांवर धावताना दिसतात.अशाच रिक्षाच्या शोधात असताना आमची गाठ पडली “सय