सफर राज्याच्या वाईन कॅपिटलची सध्या रोजचं वर्तमानपत्रांमध्ये सावरकरांच्या माफीनाम्यावरून पेटलेलं वाक्युद्ध पहाते तेव्हा तेव्हा मला आमची नाशिकची ट्रिप आठवते. वाटतं की जे जे कोणी आपापल्या परीने आणि बौद्धिक कुवतीनुसार सावरकरांविषयी गरळ ओकतायंत,त्यांनी ब्रिटिशांना लिहिलेल्या माफीनाम्याचा पूर्ण संदर्भ समजून न घेता त्यांच्यावर लांच्छन लावतायंत,त्यांना जर का त्यांच्या जन्मस्थळी नेलं तर कदाचित सावरकरांच्या देशभक्तीवर,त्यांनी स्वातंत्र्यासाठी केलेल्या अफाट त्यागावर संशय घेण्याची ह्या थोर मंडळींना यत्किंचितही इच्छा होणार नाही.पण जसं तुकाराम म्हणतात," मूढा सांगणे न लगे " .... असो... आमची लेक जसजशी विवाहयोग्य वयाकडे जवळजवळ सरकतेय तसतसं तिच्या लग्नासाठी काय वेगळं करता येईल असे विचार अध्येमध्ये मनात डोकावत असतात. सध्या डेस्टिनेशन वेडींग्सचं भलतंच पीक आहे त्याच अनुषंगाने कोणतंही मॅगझीन किंवा पेपरमध्ये एखादं सदर त्यासंदर्भात आलेलं असेल तर मग आवर्जून वाचणं होतंच .अशाच एका सदरामध्ये नाशिकच्या सुला वाईनरीबद्दल छापून आलं होतं. मगअसं एखादं डेस्टिनेशन जे साधारण आपल