Skip to main content

Posts

Showing posts from October, 2023

पावनखिंड

 पावनखिंड   काही संज्ञा रूढार्थाने आपल्यासारख्या सर्वसामान्यांमध्ये अशा रूजतात की जसे काही ते समानार्थी शब्दच असावेत.अगदी उदाहरणादाखलच सांगायचं तर एखाद्या मूळ दस्तावेजाची नक्कल म्हणजे झेरॉक्स किंवा मिनरल वॉटर म्हणजे बिस्लेरी इत्यादी.वास्तविक पाहता झेरॉक्स काय किंवा बिस्लेरी काय ह्या खऱ्या तर कंपन्या पण मूळप्रतीची नक्कल म्हणजे झेरॉक्स आणि मिनरल वॉटर मग ते कोणत्याही ब्रॅण्डचं असो लोकं सर्रास त्याला बिस्लेरीच संबोधतात.तसंच किमान सगळ्या मराठी लोकांच्या मनात,बाजीप्रभू देशपांडे म्हणजे पावनखिंड हे समीकरण कोरलेलं आहे.शीर्षकच असं आहे की ज्याला शिवकालीन इतिहासाचा पुरेसा परिचय आहे त्या कोणालाच पावनखिंडीबद्दल फार काही सांगण्याची गरज पडत नाही.सिर्फ नाम ही काफ़ी हैं..... किल्ले पन्हाळा    जवळपास चाळीस एक वर्षांपूर्वी जेमतेम दहा वर्षांची असताना पन्हाळगड चढून जाण्याची संधी मिळाली होती त्यामुळे गडाच्या आठवणी तशा खऱ्या धूसरच झालेल्या होत्या पण आठवणींचा मोहोळ मात्र होता.त्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा देण्याची एक अजब उत्कंठाही होती.अशाच उत्कंठेने काही वर्षांपूर्वी प्रतापगड पाहायला गेलो होतो,त्यावेळी लहानप