Julley(थँक यू) लडाख आईचं आपल्या सगळ्या लेकरांवर सारखंच प्रेम असतं असं म्हणतात पण अपवादाने नियम सिद्ध होतो तसचं काहीसं आहे लडाखचं.म्हणायला लडाखसुद्धा हिमालयाचंच लेकरू,अगदी आता आता २०१९ मध्ये केंद्रशासित प्रदेश म्हणून नवी ओळख मिळालेला लडाख काश्मीरचा खरंतर सख्खा भाऊ.पण जितकं काश्मीर ट्युलिप्स, केशर, चेरी, अक्रोड, सफरचंद, क्रॅनबेरीज, ब्लू बेरीज,ब्लॅक बेरीज अशा नानाविविध शेलकी फळंफुलं,दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या आणि झरे अशा निसर्गदत्त श्रीमंतीने समृद्ध आहे तितकीच निसर्गाने लडाखला सावत्र वागणूक दिल्यासारखं वाटतं.त्यामुळे निसर्गसौंदर्याच्या आणि माणसांच्या मनोवृत्तीच्या मामल्यात लडाख काश्मिरच्या बरोबर विरुद्ध.अर्थात हाताची पाच बोटं सारखी नसतात तर मग हिमालयाची ही बोटं म्हणजे लेकरंसुद्धा सारखी कशी असतील.जितकं काश्मीर आपल्या ईशान्येकडच्या राज्यांसारखं निसर्गसंपन्न,हिरवंगार आणि एखाद्या लावण्यवतीसारखं वाटतं तितकंच लडाख रूक्ष,रेताड,उजाड आणि एखाद्या रंग रूपात अंमळ जास्तच डाव्या असलेल्या एखाद्या रांगड्या पुरुषासारखं वाटतं.पण २००९ मध्ये इथल्या सोनम वांगचुक नामक भूमिपुत्राच्या जीवनपटावरून प्रेरणा घेत