अजब मुलखाची गजब कहाणी जन्माला येणारा प्रत्येक जण आपापलं नशीब कपाळावर लिहून आलेला असतो , असं किती सहज म्हणून जातो आपण . म्हटलं तर वाचायला आणि वाटायला , एक साधं सरळ सोपं वाक्य . ह्या अशा वरकरणी साध्या सोप्या वाटणाऱ्या विधानाच्या मागेसुद्धा वास्तवात काही गर्भितार्थ असेल अशी साधी शंका सुद्धा मनात डोकावत नाही . पण फेसबुकवरच्या एका पोष्टीने मात्र ह्या सत्याचा मागोवा घ्यायला भाग पाडलं . मार्च २०२० मध्ये लॉकडाउन झाला आणि लोकांमध्ये दडलेल्या सुप्त कलांना जसा ऊत आला . त्या लॉकडाउनच्या काळात न जाणो किती हौशी लेखक , कवी , चित्रकार उदयाला आले . तसं आधीही " फेसबुक " नामक मुक्त व्यासपीठ झुक्याच्या कृपेने २००४ पासून अविरत लोकसेवेचे कर्तव्यं अतिशय चोख बजावतंय पण लॉकडाउनच्या कालावधीत हाताशी जरा जास्तच वेळ असल्याने समाज माध्यमांवर कधीही फारशी सक्रिय नसलेली आमच्यासारखी मंडळीसुद्धा वाचकांच्या रूपाने का होईना बऱ्यापैकी ह्या व्यासपीठावर अवतरली . घरबसल्या वेगवेगळ्या विषयांवरच्या