ईशान्यरंग (भाग -१) सफर लामांच्या भूमीची हिमालय एक व्यसन आहे.जो एकदा हिमालयात फिरायला गेला तो परत परत हिमालयाच्या वेगवेगळ्या वाटा चोखाळत राहतो. बरं त्याचे रंग तरी किती म्हणावे.काश्मीर मध्ये तो शृंगारिक दिसतो,हिमाचलमध्ये रांगडा,उत्तराखंड मध्ये सात्विक तर ईशान्येला निसर्गसुंदर.काही वर्षांपूर्वी सैन्यात असलेल्या माझ्या शाळेतल्या वर्गमित्राने फेसबुकवर एक फोटो पोस्ट केला,खरंतर त्याने सहज म्हणून तो फोटो पोस्ट केला पण त्या जागेच्या सौंदर्याने मी इतकी मोहून गेले की ती जागा मनात आणि डोक्यात कोरली गेली ती कायमची,भारत चीन सीमेवरचं नितांत सुंदर असं अरुणाचल प्रदेश मधलं तवंग. वीरमरण आलेल्या आपल्या २४२० भारतीय जवानांच्या सांडलेल्या रक्ताने पावन झालेली अशी ही लामांची भूमी,अरुणाचल प्रदेश ...... खूप काही इतिहास आहे तवंगला त्यामुळे लिहिण्यासारखं आणि जाणून घेण्यासारखंही बरंच काही,लिहावं तितकं थोडकं.पण सगळ्यात महत्त्वाचं जाणून घेण्यासारखं जर का काही असेल तर ते आहे १९६२ च्या भारत चीन युद्धाच्या अंगावर काटा आणणाऱ्या आपल्या निधड्या छातीच्या जवानांच्या बलिदानाच्या युद्धगाथा.. सूर्याच्या पहिल्यावह