दख्खनचं गतवैभव कधी कधी उत्स्फूर्तपणे घडणाऱ्या गोष्टी अविस्मरणीय आनंद देऊन जातात.दोन वर्षांपूर्वी आम्ही हम्पी बदामीला जाण्यासाठी खूप हाणामाऱ्या केल्या पण काही हाताशी लागलं नाही.हम्पीमधलं एकही हॉटेल आम्हा पामरांना आश्रय द्यायला तयार नव्हतं,शेवटी आम्ही हंपी बदामीचा नाद सोडून दुसरंच ठिकाण शोधून तिथला इतिहास पालथा घातला.मागचे दोन वर्षं कोरोनाने बाकी काही चांगलं काम केलं असेल नसेल पण हौशी पर्यटकांना विनासायास हॉटेल बुकिंग मिळण्याची तजवीज नक्कीच केली. दोन वर्षांपूर्वी जिथे एक हॉटेल आम्हाला थारा द्यायला तयार नव्हतं तिथे ह्यावर्षी ओमिक्रोनच्या आलेल्या नव्या लाटेचा प्रसादच म्हणा ना की आम्हाला म्हणाल त्या हॉटेलमध्ये आम्ही ठरवू तितके दिवस बुकिंग मिळत होतं.आज मितीला कोरोनापूर्व काळात असलेल्या संख्येच्या जेमतेम २० टक्के पर्यटक हंपीमध्ये येत असल्यामुळे पर्यटनातून मिळणाऱ्या उत्पन्नातून उदारनिर्वाह चालवणाऱ्या स्थानिक लोकांना कोरोनाचा खरंच खूप जबरदस्त फटका बसलाय हैत शंका नाही.एरव्हीच्या पर्यटनाच्या हंगामात जरुरीपेक्षा जास्त गजबजलेली इथली सगळी पर्यटन स्थळं आज बऱ्यापैकी ओस पडलीयत,शिवाय इथे बरीचशी देवळं