Skip to main content

Posts

Showing posts from 2022

अजब मुलखाची गजब कहाणी

  अजब मुलखाची गजब कहाणी   जन्माला येणारा प्रत्येक जण आपापलं नशीब कपाळावर लिहून आलेला असतो , असं किती सहज म्हणून जातो आपण . म्हटलं तर वाचायला आणि वाटायला , एक साधं सरळ सोपं वाक्य . ह्या अशा वरकरणी साध्या सोप्या वाटणाऱ्या विधानाच्या मागेसुद्धा वास्तवात काही गर्भितार्थ असेल अशी साधी शंका सुद्धा मनात डोकावत नाही . पण फेसबुकवरच्या एका पोष्टीने मात्र ह्या सत्याचा मागोवा घ्यायला भाग पाडलं . मार्च २०२० मध्ये लॉकडाउन   झाला आणि लोकांमध्ये दडलेल्या सुप्त कलांना जसा ऊत आला . त्या लॉकडाउनच्या काळात न जाणो किती हौशी लेखक , कवी , चित्रकार उदयाला आले . तसं आधीही " फेसबुक " नामक मुक्त व्यासपीठ झुक्याच्या कृपेने २००४ पासून अविरत लोकसेवेचे कर्तव्यं अतिशय चोख बजावतंय पण लॉकडाउनच्या कालावधीत हाताशी जरा   जास्तच वेळ असल्याने समाज माध्यमांवर कधीही फारशी   सक्रिय नसलेली आमच्यासारखी   मंडळीसुद्धा   वाचकांच्या रूपाने का होईना बऱ्यापैकी ह्या व्यासपीठावर अवतरली . घरबसल्या   वेगवेगळ्या विषयांवरच्या

ती फुलराणी

  ती फुलराणी    "हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणांच्या मखमालींचे" "त्या सुंदर मखमालींवरती,  फुलराणी ती खेळत होती" बालकवींच्या कवितेतल्या ह्या ओळी,आपल्यासारख्या काँक्रीटच्या जंगलात राहणाऱ्या लोकांसाठी तरी किमान फक्त स्वप्नंच.ही फुलराणी प्रत्यक्षात असेल अशी साधी शंकासुद्धा कधी आली नाही.पण एखादी गोष्ट करायची ठरवली की त्याच्या हात धुवून मागे लागणं ही माझी वाईट खोड.असंच काहीसं झालं होतं माझं " Valley Of Flowers " च्या बाबतीत.हिमालय आधीच माझा  जिव्हाळ्याचा विषय.त्यात ईशान्य भारताची तोंडओळख झाल्यापासून तर जेव्हा संधी मिळेल तेव्हा  हिमालयाचे वेगवेगळे रंग उलगडून पाहण्याचा आताशा छंदच जडलाय जीवाला.उत्तराखंड नैसर्गिक आणि आध्यात्मिक अशा दोन्ही अंगांनी समृद्ध असल्यामुळे उत्तराखंडमध्ये फिरणं हा कायमच एक मौलिक अनुभव असतो.खटकते ती फक्त तिथल्या स्थानिक लोकांची आणि  आलेल्या पर्यटकांचीही  स्वच्छतेबाबतची कमालीची अनास्था. मुळातच जातिवंत भटकी, त्यामुळे कोणत्याही मासिकात,वृत्तपत्रात,दैनिकांत,आलेलं कोणतंही प्रवासवर्णन मी सहसा वाचायचं सोडत नाही.साहजिकच साधारण सात आठ वर्षांपूर्वी