गंध गुजरातचा (भाग २) साधारण तीन चार महिने उलटले की आमच्यासारख्या भटक्यांच्या तळपायाला खरी तर खाजच यायला सुरूवात होते आणि त्यात गेले दोन वर्ष कोरोनाच्या कृपेने तब्बल जवळपास दोन वर्ष आम्हाला भटकंती उपास घडला.म्हणजे तुम्हाला आमच्या दैनेची कल्पना द्यायचीच असेल तर एखाद्या अट्टल बेवड्याचं उदाहरण पुरेसं आहे. त्याला जर त्याचा रोजचा दारूचा रतीब मिळाला नाही तर त्याची जी तगमग होत असेल तशीच काहीशी तगमग आमची ह्या दोन वर्षांत झाली असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही.त्यामुळे परीक्षा संपण्याचा आणि लॉकडाऊन उघडण्याचाच अवकाश होता की आम्ही पहिली संधी साधून बाहेर पडलोच.हाताशी जर का अगदीच मोजका वेळ असेल तर खाण्यापिण्याची चंगळ आणि अत्यंत सुस्थितीतले रस्ते ह्या दोन प्रमुख कारणांमुळे आपलं "सख्खे शेजारी" राज्यं आमच्यासाठी नेहमीच "गो टू प्लेस "असते.मला अगदी ठळकपणे आठवतंय,आमच्या लहानपणी गुजरातचा कधीच एक पर्यटन स्थळ म्हणून विचारही होत नसे. पण काही वर्षांपूर्वी अमिताभ बच्चननं ह्या राज्याचं पर्यटन स्थळ म्हणून ब्रॅण्डिंग करायला सुरुवात केली आणि रातोरात गुजरातला पर्यटनाच्या दृष्टीने सुगीचे दिव