गण गण गणांत बोते काही गोष्टींचा योगच असावा लागतो असं मला फार राहून राहून वाटतं.विशेषतः देवदर्शनाच्या बाबतीत.आपण जायचं ठरवावं आणि सगळं मनासारखं म्हणजे योजल्याप्रमाणे घडत जावं असं फार वेळा होत नाही. त्यातून सध्याच्या बिकट परिस्थितीत प्रवास करायचं धाडस करणं म्हणजे धोक्याची घंटा. खरंतर मी आणि माझा नवरा फार आस्तिकही नाही आणि नास्तिकही नाही.देवाचं मूर्तरूप आम्हाला तितकंसं मान्य नसलं तरी एक दिव्य शक्ती किंवा ऊर्जा म्हणून त्याचं अमूर्तरूप आम्हाला भावतं.त्यामुळे फार नाही तरी क्वचित अध्येमध्ये आम्हाला असे देवदर्शनाचे झटके येत असतात.आम्हाला वावगं असतं ते फक्त दोनच गोष्टींचं आपल्याकडच्या देवस्थानांचं पावित्र्य अबाधित न ठेवणाऱ्या देवस्थानांमध्ये चालणाऱ्या व्यावसायिकिकरणाचं आणि देवस्थानाच्या ठिकाणच्या व आजूबाजूच्या परिसरातल्या कमालीच्या अस्वच्छतेचं.ह्या दोन गोष्टींमुळे देवस्थानांचं मांगल्यच हरवून जातं. देवस्थानं आणि स्वच्छता ह्यांचा सर्वसाधारणपणे एकमेकांशी छत्तीसचा आकडा . मागच्या वर्षीपासून कारंज्याला जायचं खूप मनात होतं पण काही ना काही आडवं येत होतं. पण सध्या समाज माध्यमांवर फिरणारी शेगाव सं