Thy Name Is England " काय गं माधुरी,यंदा सुट्टीला कुठे ? ",योगवर्गात जरा स्थिरस्थावर होते की नाही तो एक काकू विचारत्या झाल्या. तसं त्यांच्या माझ्या वयात अंतर बरंच असलं तरी "भटकंती" ह्या एका समान धाग्याने आमच्या वयामधलं अंतर बाजूला ठेवून आजवर वर्षानुवर्षं आमची मैत्री घट्ट केलीय. मग काय आम्हा दोघींना तेवढंच निमित्त गप्पाष्टकांसाठी.गप्पांच्या ओघात कळलं की त्यांचा इंग्लंडच्या सुट्टीचा बेत यूके कॉन्सुलटेच्या कृपेने पुरता उधळला गेला होता. त्यामुळे काहीश्या म्हणण्यापेक्षा बऱ्याच उद्वेगल्या होत्या त्या.साहजिकच होतं म्हणा. पैसे वाया गेल्याचं दुःख तर होतंच पण व्हिसाचा अर्ज करण्याच्या किचकट सोपस्कारापासून ते सांपत्तिक स्थिती ,संशयास्पद पार्श्वभूमी असं कोणतंही सबळ कारण नसताना व्हिसा नाकारला जाण्यापर्यंत त्यांना झालेला मनःस्ताप,त्याबद्दलची चीड आणि अपेक्षाभंगाचं दुःख त्यांच्या प्रत्येक शब्दात उमटत होतं. २००५ च्या अखेरीपर्यंत दुबईतून काढता पाय घेण्याचं आम्ही जवळपास नक्की केलं होतं. तसं दुबई मधून का कोण जाणे पण कोणताही आंतरराष्ट्रीय प्रवास फार कठीण वाटत नाही.मग आता दुबई सोडणारच