Skip to main content

Posts

Showing posts from September, 2020

गालबोट

  गालबोट  मागच्या वर्षीच्या एप्रिलमध्ये पॅरिसचं तथाकथित सुप्रसिद्ध बॅसिलिका " Notre  Dame " आगीत होरपळून निघालं आणि साऱ्या जगात एकच हळहळ पसरली. का कुणास ठाऊक पण  मला मात्र त्याचं फारसं दुःख झालं नाही. कधी कधी त्या वास्तूचा थेट संबंध नसला तरी  प्रवासात अनपेक्षितपणे येणाऱ्या चांगल्या वाईट अनुभवांचा संबंध आपण अतिशय सोयीस्करपणे त्या त्या स्थळांशी कायमस्वरूपी जोडून मोकळे होतो आणि आपल्या सहजसुलभ  मानवी  स्वभावानुसार त्या कटू आठवणी किंवा प्रसंग आपल्या  मनावर कायमचे कोरून ठेवतो. असे घडणारे प्रसंग अकारण आपल्या प्रवासाच्या आनंदाला गालबोट लावतात. ते ही अगदी अनपेक्षितपणे. ह्या " Notre Dame " ला लागलेल्या आगीने माझ्या त्या आठवणीवर नकळत हळूच फुंकर घातली. वास्तविक ह्या Notre Dame चा थेट असा काहीच संबंध नव्हता त्या प्रसंगाशी खरं  पण Notre Dame   आम्हाला कायमचं लक्षात राहिलं  ते त्याच प्रसंगामुळे.आमच्या आतापर्यंतच्या युरोप प्रवासामध्ये जनमानसात प्रिय असलेले पण मला फारसे न भावलेले असे दोन देश म्हणजे फ्रान्स आणि इटली.निसर्गसौंदर्यात अजिबातच हे देश कुठल्याही अंशाने उणे नाहीत पण उणे आ