रं गि लो रा ज स्था न बऱ्याचदा आपल्याला स्वतःची पुरेशी ओळख नसते. पण काही वेळेस अशी संकटं किंवा असा पेच समोर येऊन उभा ठाकतो की आपला आपल्याला नव्याने शोध घ्यावाच लागतो. तसंच काहीसं आपल्या सगळ्यांचं ह्या कोरोनाच्या महासंकटात झालंय.कित्येक गोष्टी आपण स्वबळावर किंवा स्वकौशल्यावर सहज करू शकतो ह्याचा शोध आपल्या सगळयांनाच आता आताशा लागतोय. मग अगदी घरच्या घरी लादी पाव करणं असो किंवा मग प्रवास. " इतके दिवस आपण का बरं प्रयत्न करून पहिला नाही? "असा प्रश्न पडतो. लॉकडाऊनने उबलेली लोकं लॉकडाऊन नंतरच्या काळात भारतातल्या अशा कधी न पाहिलेल्या आणि ऐकलेल्या स्थळांना भेटी देण्याच्या आशेवर आतापासून बसलेले आहेत आणि तेही स्वबळावर.सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून कोणत्याही ग्रुप टूरचा पर्याय निवडण्याऐवजी वैयक्तिकरित्या प्रवास करण्याकडे जाणवणारा लोकांचा वाढता कल लक्षात घेऊन बऱ्याच प्रथितयश टूर कंपन्यांनी आतापासूनच ग्राहकांना लुभावणारे अनेक व्यक्तिगत पर्याय उपलब्ध करून देण्याच्या उद्देश्याने आपली कंबर कसलीय.त्यामुळे येणाऱ्या नजीकच्या काळात आपल्याला स्वतःबद्दल अजूनच नवनवीन शोध लागले तर आश्चर्य वाटाय