दख्खनच्या जंगलवाटा कधीकधी काही ठिकाणं अगदी योगायोगानेच पहिली जातात.नाही तर मुद्दाम वाट वाकडी करून ती पाहायला जाण्याचा आपण सहसा विचार करत नाही किंवा करणारही नाही कदाचित.नेमकं असंच काहीसं झालं जेव्हा आम्ही कूर्ग पहायचं ठरवलं. क्लब महिंद्राची मेम्बरशिप घेतल्यापासून आम्ही त्यांच्या कूर्गच्या प्रॉपर्टीचं बरंच कौतुक ऐकून होतो त्यामुळे ती प्रॉपर्टी पाहण्याचं कुतूहल तर होतंच,पण एखादं ठिकाण ठरवल्यावर आसपासची फारशी वाट न चोखाळली गेलेली ठिकाणं हुडकून काढणं आता काहीसं सवयीनेच होतं. त्यामुळे तेव्हा मसिनागुडी आणि येरकऊडचा समावेश आपसुकच झाला.ठिकाण कोणतंही असू दे,भारतात किंवा भारताबाहेर आमचा बराचसा भर हा "Being Glocal" वर असतो.ह्या तत्त्वाला अनुसरून आम्ही प्रत्येक ठिकाणी खाजगी वाहन वापरण्याऐवजी किंवा भाड्याने घेण्याऐवजी शक्य तितकं आणि शक्य असेल तिथे,त्या भागात वापरल्या जाणाऱ्या आणि उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाहतुकीची माध्यमं वापरण्याचा प्रयत्न करतो आणि पसंतही करतो ज्याच्यामुळेआम्हाला भटकंतीचा खराखुरा आनंद मिळतो. याव्यतिरिक्त तिथल्या स्थानिक लोकांशी संवाद साधणं,त्यांचं जीवन जवळून पहाण