देवभूमी यंदाच्या कोरोना विषाणूच्या जागतिक महासंकटाने बर्याचशा उद्योगधंद्यांवर विशेषतः सेवा क्षेत्रावर फारच दुस्तर परिणाम झाला. सूक्ष्म आणि लघु उद्योग तर जवळपास बंदच पडले.सेवा क्षेत्रातली अशीच दोन अत्यंत महत्वाची क्षेत्रं म्हणजे आतिथ्य उद्योग आणि पर्यटन उद्योग , ज्यांना सगळ्यात मोठा फटका यंदाच्या ऐन पर्यटनाच्या हंगामात ह्या साथीमुळे सोसावा लागलाय.ह्या दोन्ही क्षेत्रांना पुन्हा त्यांचा सूर गवसायला किती वेळ जाईल ह्याचा अदमास बांधता येणं जरा कठीणच. मग अशा बिकट परिस्थितीत , महत्प्रयासाने वर्षानुवर्षे बांधून ठेवलेले ग्राहक आणि कमावलेला गल्ला हातचे निसटू नयेत ह्यासाठी विमान वाहतूक तसचं ट्रॅवल आणि टूर कंपन्या आपापलं अस्तित्व व ग्राहकांचा भटकंतीमधला रस टिकून रहावा म्हणून वेगवेगळ्या शकला आणि क्लृप्त्या लढवतायत .ह्या सगळ्या...