पिझ्झा , पास्ता आणि कोरोना... “कोरोना” नामक एक अदृश्य विषाणू काय आला आणि त्याने पाहता पाहता अख्खं जग आपल्या विळख्यात घेतलं , एखाद्या अजगरासारखं.त्यात स्वतःला धनाढ्य आणि बलाढ्य म्हणवणार्या भल्या भल्या देशांची , यूरोप मधल्या विशेषतः इटली , जर्मनी , फ्रांस आणि त्याच बरोबरीने अमेरिकेची , ह्या विषाणूची साथ आवरता आवरता अक्षरशः भंबेरी उडालीय. ह्या साथीला आवरण्यासाठी थोड्या फार प्रमाणात प्रभावी ठरण्याचीअपेक्षा असलेलं H ydroxychloroquine मिळवण्यासाठी एरव्ही कृष्णवर्णीय म्हणून भारतीयांना कसपटा समान लेखणार्या वर्णभेदाच्या पुरस्कर्त्या यूरोप , अमेरिकेला मदतीसाठी भारताचे पाय धरण्याची वेळ आली . भारताने मानवीय हेतूने तात्काळ ह्या औषधाच्या निर्यातीवरचे निर्बंध काही अंशी शिथिल करून जवळपास पंचवीस देशांना ह्या औषधाचा पुरवठा केलादेखील पण ह्या औषधासाठी भारताला धमकी वजा विनवणी करणार्या अमेरिकेला , धमकी न देता सुद्धा भारताने ही मदत माणुसकीला जागून अशीही पुरवलीच असती हे मात्र दुर्दैवाने समजलं नाही कारण सेवाभाव हा खरं तर आपल्या भारतीयांचा अंगीभूत गुण आहे , अगदी रक्तात मिसळलेल्या ऑक