Skip to main content

Posts

Showing posts from February, 2020

राधे राधे ...

राधे राधे ... आज फेसबूकने “ your memories nine years ago” असं म्हणून आठ नऊ वर्षांपूर्वीचा फोटो टाकला आणि मन साहजिकच नऊ वर्ष मागे भूतकाळात जाऊन पोहोचलं....आमच्या दिल्ली-आगरा ट्रीपमध्ये ! सहा एक वर्षांचा असेल त्यावेळी माझा धाकटा लेक.एकामागून एक झपाट्याने तो   Tintin,Archie,Tinkle,Sherlock Holmes, Agatha Christie बरोबरच आपल्या रामायण , महाभारतातल्या पौराणिक कथा आणि शिवाजी महाराजांचा इतिहास फार रस घेऊन आणि गोडीने अमर चित्रकथांच्या माध्यमातून वाचत होता. त्याचवेळी टीव्हीवरसुद्धा नेमकी छत्रपती शिवाजी महाराजांवरची एक मालिका प्रक्षेपित होत असे ज्यात शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका दाखवली होती.रोज रात्री झोपताना मुलांचा गोष्टी ऐकण्याचा रतीब असे . त्याचा बाबा  इतिहासातलं रोज एक नवीन पान त्याच्यासमोर गोष्टीरूपाने उलगडत असे.त्यामुळे इतिहास त्याच्यासाठी एक कंटाळवाणा विषय न राहता अतिशय  रंजक झाला होता आणि इतिहासबाबतचं त्याचं कुतूहल एकंदरीतच अगदी शिगेला पोहचलं होतं.त्याच्या डोक्यात घोळणार्‍या असंख्य प्रश्नांना आम्ही आमच्या परीने कितीही समाधानकारक उत्तरं दिली तरी त्याचं कुतूहल काही