नमामि गंगे "मुस्कुराईये की आप लखनऊ में हैं।" लखनऊ एअरपोर्टवर पाऊल टाकता क्षणी तिथल्या भिंतीवर लिहिलेल्या ह्या वाक्याने माझं लक्ष वेधून घेतलं.ते वाचून खरंच काहीही कारण नसताना चेहऱ्यावर हसू उमटलं.वाटलं नुसतं हे वाक्य वाचून जर इतकं प्रसन्न वाटतंय तर मग लखनऊ मध्ये फिरताना किती प्रसन्न वाटेल.पण आधीच फ्लाईट उशिराने पोहोचली होती त्यामुळे अजून वेळ न दवडता पटापटा बेल्टवरून बॅगा उचलून आम्ही बाहेर आमच्यासाठी उभ्या असलेल्या टॅक्सीत बसून अयोध्येकडे निघालो. उत्तर प्रदेश भारतातलं सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेलं कृषीप्रधान राज्य.मोहोरी,ऊस आणि बटाटे इथली प्रमुख पिकं.महामार्गांच्या अगदी लगत जर्द पिवळ्या फुलांनी आच्छादलेली लांबच लांब पसरलेली मोहोरीची हिरवीगार शिवारं डोळ्यांना गारवा देत होती.त्यात अगदी दुपारच्या दोनच्या टळटळीत उन्हातसुद्धा हवेत किंचित असलेला गारवा छान आल्हाददायक वाटत होता.अयोध्येला जाण्याच्या वाटेवर टॅक्सीत बसल्या बसल्या लहानपणी टीव्हीवर पाहिलेल्या रामराज्य,भरतभेट सारख्या ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटांमधली काही दृश्यं झरझर डोळ्यांसमोर तरळून गेली. त्यावेळी बऱ्याच तांत्रिक मर्यादा